कधी तरी प्रवास करायचा आहे.
प्रवास करायचा आहे अश्या सहप्रवाश्यांबरोबर जे सतत मोबाईलवर बोलणार नाहीत.
जे एकतर तुमच्याशी संवाद तरी साधतील नाहीतर शांतपणे हाताची घडी व तोंडावर बोट ठेवुन निमुटपणे मोबाईक वर वटवट न करता बसुन राहतील.
जे एकतर तुमच्याशी संवाद तरी साधतील नाहीतर शांतपणे हाताची घडी व तोंडावर बोट ठेवुन निमुटपणे मोबाईक वर वटवट न करता बसुन राहतील.
मुंबई ते पुणे , गाडीतले चौघेही मुंबईपासुन पुण्यापर्यंत न थांबता तीन चार तास मोबाईलवर नुसते बोलत राहिलेत.
बोलतच रहा, बोलतच रहा, बोलतच रहा. आणि ऐकतच रहा, ऐकतच रहा, एकाच वेळी चौघांचे बोलणे ऐकतच रहा.
असा प्रवास करायचा आहे , ज्या गाडीमधे चालकाने लावलेली चांगली गाणी ऐकता ऐकता कधी आपले ठिकाण आले हे कळलेच नाही म्हणण्याइतपत.
नाही सहन होत, कानावर अत्याचार.
2 comments:
खरय मोबाईलवर बोलायचं फॅड जरा जास्तच वाटलं मलाही यावेळी...तरुणच नाही तर अगदी कुठल्याही वयाची मंडळी..कधी वाटत इथे अमेरिकेत इनकमिंग फ्री नाही ते एकार्थी बरंय
कंटाळा येतो, सतत लोक मोबाईल वर तासंनतास बोलत असतात, मध्यंतरी या वर वर्तमानपत्रात लेख आला होता, जगात भारतीय मोबाईलवर सर्वात जास्त बोलत असतात या वर
Post a Comment