सप्टेंबर ४. दै.सकाळनी राजाभाऊंची भुक चाळवली. त्यांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त केले.
लेख तसाच भारीभक्कम. लीना शर्मा लिखीत " जरा हटके, चवदार थालिपीठ ", सोबत पुण्यात चवदार थालिपीठे कुठे मिळतात याची भली मोठी यादी.
मग काय राजाभाऊ निघाले ज्ञानप्रबोधिनीच्या दिशेने, सुजन फूड्स मधे, थालिपीठावर ताव मारायला.
हाय रे देवा, नशिबाने डाव साधला. नेमके ज्ञानप्रबोधिनीजवळ गेल्यावर त्यांना त्या जागेचे नाव आठवेनाशे झाले, त्यात काय मोठेसे, आपण शोधुन काढु.
मग त्यांनी ज्ञानप्रबोधिनी समोर समोशे इ. तत्सम पदार्थ विकणाऱ्याला विचारले.
"येथे कोणाकडॆ चांगली थालिपीठे मिळतात. "
"थाली क्या ? "
"थालिपीठ "
"थालि पे क्या ? "
"अरे बाबा खानेको, थालिपिठ "
"अच्छा, अच्छा, आगे दुर्वांकुर मे थाली खानेको मिलेगा. "
मग पेटलेले राजाभाऊ तेथुन निघाले ते टिळक रस्तावरच्या त्यांच्या आवडीच्या जागी, ग्राहक पेठेत, कटलेटस खायला.
असे एका कटलेटनी कधी कोणाचे पोट भरते काय ? ते तर केव्हाच दाढेच्या कॅवीटी्त गेले, पोटापर्यंत पोचायचे कसे ?
राजाभाऊंच्या बायकोला तुळशीबागेत खरेदीला जायचे होते. आता तु्ळशीबागेत गेल्यावर जोश्यांच्या श्रीकृष्ण मिसळ मधे मिसळ खायला न जाणे होईल काय ?
लक्ष्मी रस्तावर चालत, चालत, चालतांना त्यांना अचानक खुप तहान लागली.
जनसेवा दुग्धालय आणि मसाला दुध.
सोबत उपवासाचा पॅटीस
No comments:
Post a Comment