Sunday, October 14, 2007

मला भेटलेले देवदुत.

डॉ. जेम्स तिवडे.

तुमची गुढग्याची वाटी बदलायलाच हवी, वीस-बावीस वर्षा पुर्वी गुढघेदुखीने त्रस्त झालेल्या माझ्या वडीलांना एका प्रख्यात तज्ञाने सल्ला दिला, दुसरा पर्यायच नाही, चालुही न शकणाऱ्या वडीलांना भेटले तेव्हाचे नवखे डॉ. जेम्स तिवडे, एक साधी सोपी लहानशी शस्त्रक्रिया आपण करुन पाहुया काय होते ते, नाहीच बरे वाटले तर तुम्ही मोठाली शस्त्रक्रिया करायला मोकळे आहातच. त्या छोट्याश्या शस्त्रक्रिया वर आजही वडील दुनिया चालतात.

डॉक्टरची जबाबदारी केवळ रुग्ण बरा होवुन घरी गेला तरी संपत नाही, घरी त्याचे पुनर्वसन, काळजी घेणे कसे काय चालले आहे, त्यान व्यायाम कोणता करयला हवे हे नंतर आवर्जुन आमच्या घरी येवुन सांगणारे व त्या साठी कोणताही मोबदला न घेता येणारे डॉ. या पॄथ्वीलोकावर विरळाच.

त्या नंतर माझ्या आईचे दोनदा हिप जॉईंट चे फ्रक्चर साठी व एकदा त्यात इंफेक्श्न झाल्याने आत बसवलेली चकती काढुन टाकण्याची शत्रक्रिया त्यांनीच केली. त्यात परत एकदा तिचा पाठीचा मणका फ्रक्चर झाला असता तीची काळजी ही घेणारे तेच.

डॉ. विभास मोडक.

क्रिकेट खेळतांना सायंकाळी माझ्या चिरंजीवाने लहानपणी हात फ्रक्चर करुन घेतला. डॉ. जेम्स तिवडे नेमके परदेशी गेलेले. मुलाच्या डॉ. नी सांगीतले इकडे तिकडे कोठेही जावु नका, याला घेवुन डॉ. विभास मोडक कडेच जा. डॉ. नेमके ठाण्याला लग्नाला गेलेले. त्यांना दुरध्वनी केले. ते म्हणाले आम्ही लवकर निघतो, घरी आल्या वर तुम्हाला दुरध्वनी करतो, तुम्ही मुलाला घेवुन माझा घरी या. रात्री त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावले, तपासले, उपाशी मुलाला खावु घातले व दुसऱ्या दिवशी प्लस्टर घातले. त्यांचा व त्याच्या आईचा, बायकोचा हा दयाळु पणा आयुष्यभर विसरणॆ कठीण आहे. नंतर डॉ. जेम्स तिवडे बरोबर माझ्या आईच्या शस्त्रक्रियेच्या वेळी डॉ. विभास मोडक देखील होते.
डॉ. संजय गोडबोले.

मोठया डॉ. ना त्याचे रुग्ण वेळीअवेळी लहानसहान आजरपणासाठी परेशान करत असतील तेव्हा ? आम्हीच ते परेशानकर्ते. तरी देखील हसतमुख चेहऱ्याने आमच्या चिंता, काळजी व रोग दुर करणारे डॉ. संजय गोडबोले यानी एकदा माझ्या आईचे प्राण वाचवले. बऱ्याच वर्षापुर्वी तिला अटॅक आला, तत्काळ आय,सी.यु त दाखल केले. हा हार्ट अटॅक नव्हे , पण जे मी निदान केले आहे ते चांगले नव्हे, आपण प्रयत्नांची शर्थ करुया, हे ऍकुट पॅनक्रायटीस आहे ( त्या काळात याचे प्रमाण बहुदा नगण्य होते, फारसे ऐकीवातही नसावे ) हे मला रात्री दोन वाजता सांगत त्यांनी माझ्या आईचे प्राण वाचवले. दिड-दोन महीने ती रुग्णालयात होती.
हे सर्व डॉक्टर म्हणजे परमेश्वरच की.

2 comments:

पूनम छत्रे said...

खरच!

माझ्या ब्लॉगवर तुम्ही प्रतिक्रिया देता, त्याबदाल आभार. कृपया माझा ब्लॉग बघणार का? एका उपक्रमात तुम्हाला सहभागी करून घेतले आहे.

TheKing said...

Nice post. It really feels fortunate to meet such people in life.