Saturday, October 13, 2007

अभिनंदन - कृतिशील पर्यावरणवादी!

सकाळ मधुन

नवी दिल्ली, ता. १२ - जागतिक तापमानवाढीच्या संकटाविरुद्ध लढणारे आणि मानवजातीला त्याच्यापासून असलेल्या धोक्‍याबद्दल जनजागृती करणारे अनेक जण असतील...
डॉ. राजेंद्र पचौरी हे त्यातीलच एक. ख्यातनाम पर्यावरणवादी आणि विशेष म्हणजे कृतिशील विचारवंत. मांस उत्पादनामुळे पर्यावरणाची हानी होते; म्हणून शाकाहारी बनलेले...

संयुक्त राष्ट्रसंघाच्या "इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज' (आयपीसीसी) या संस्थेला आज अल गोर यांच्याबरोबरच शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डॉ. पचौरी हे भारतीय नाव नोबेलच्या "रेकॉर्ड बुक'मध्ये नोंदले गेले. डॉ. पचौरी हे एप्रिल २००२ पासून "आयपीसीसी'ची धुरा सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, "आयपीसीसी' हे देखील त्यांचेच "ब्रेन चाइल्ड'. त्यांचीच संकल्पना राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संस्थेने (डब्ल्यूएमओ) आणि "संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण कार्यक्रम' (यूएनईपी) यांनी उचलून धरली आणि १९८८ मध्ये ती प्रत्यक्षातही उतरली गेली.
माझा मुलालाही पर्यावरण व जागतिक तापमानवाढ या विषयात शिक्षण घ्यायचे आहे.

No comments: