घरातील काही माणसांना एक दांडगी हौस असते, घरी आलेल्या पाहुणेमंडळींची चांगली सरबाई करण्याची, मग त्या आदरातिथ्यात ते काहीच कमी पडु देत नाहीत.
पाहुणे दिवाणखाण्यात गप्पा मारत बसले असले की मग त्यांची चुळबुळ सुरु होते. फर्मान सोडले जाते , अगदी सर्वांसमोर, घरातील गॄहिणीला, हे आण ते आण, हे कर ते कर.
वास्तविक पहाता तिने सर्व गोष्टींची योग्य ती आखणी केलेली असते, काय करायचे, काय नाही, काय टाळायचे याचे आराखडे बांधलेले असतात, बेत ठरवलेले असतात.
या अशा अनाहुत हुकुमांमुळे तिची चांगलीच पंचाईत झालेली असते, होत असते, तिच्या प्रातांतील ही अनावश्यक ढवळाढवळ तिच्या साठी फारच त्रासदायक असते, विषेशःता घरात त्या वस्तु नसतील, संपल्या असतील , किंवा महिना अखेर घरात पैश्याची चणचण असताना.
याची जाणीव हुकुमकर्त्यांना नसते ते आपल्याच विश्वात मशगुल असतात.
गंमत म्हणजे या झालेल्या पंचायतीची जाणिव नंतर करुन दिल्यानंतर ही पुढच्या प्रसंगी गृहस्वामिनीचा मान राखायची त्यांची तयारी नसते, भान नसते.

ता.क. - तो मी नव्हे.
No comments:
Post a Comment