Saturday, October 20, 2007

पं.उल्हास कशाळकरांचे गायन

एन.सी.पी.ए चे भरजरी , मदहोशी माहोलात पं.उल्हास कशाळकरांचे गायन व साथीला पं. सुरेश तळवळाकरांचे तबला वादन ऐकण्यासारखे दुसरे सुख नसावे, प्रयोजन होते पं. अरविंद पारिख यांच्या वाढदिवसाचे निमित्ये. पण काल रात्री ह्या सुखाची प्राप्ती साठी फार मोठी किमंत मोजावी लागली.

आपल्या आवडत्या कलावंताचे गाणे सुरु होण्याआधी असलेल्या दुसऱ्या कलावंताचे वादन सहन करण्यासारखी शिक्षा नसावी ( माफी चाहता हु ! ही माझी वैयत्तीक मते आहेत ) . त्यात आधी सारंगीवादनाचा कार्यक्रम , जो टाळण्यासाठी मी कार्यक्रम सुरु होण्याची वेळ साडेसहाची असतांना सुद्धा जाणिवपुर्वक रात्री आठ वाजता स्थळी पोहोचलो , अरे रामा, ये क्या , अभी अभी आलाप सुरु हुवा ! मग बंदीशी गावुन दाखवायच्या, लोरी गायची, राजस्थानी लोकगीत सुनवायचे , मग त्यांचा , सर्वांचा अर्थ, गर्भीत अर्थ विशाद करुन सांगायचा, मग त्यातुन फुरसदीने अधुन मधुन सारंगीची त्याला जोड देयाची हा प्रकार. ( फिर से माफी चाहता हु !) हा सारा प्रकार मनाला पिडपीड पिड असता बाहेरच्या खुला वातावरणात आलो, आयोजकांनी मस्त पैकी केवळ चहापानाचीच नव्हे तर फराळाची उत्तम सोय केलेली होती . त्याचा माफक प्रमाणात न लाजता आस्वाद घेणे झाले. ( आधी कार्यालयात हाणहाण हाणाले होते, पोट तुडुंब भरलेले होते, पण गव्हर्नर ची गाडी भरल्या रस्तावर आली कि पोलिस कसा रस्ता मोकळा करतात तसेच काहीतरी )

इंतजारी, बेकरार, दरबदर संपले, अखेर जिस चीज़ का इंतजार था ते , पं.उल्हास कशाळकरांचे स्वर्गीय गायन सुरु झाले. राग हमीर, बसंतबहार , आणि डोलणारा मी. क्या बात है !

आयुष्यात असे सुखदायक क्षण फारच थोडे येत असतात . आता राह पाहणे आहे, कोजागीरी पोर्णिमेच्या रात्री दि,२५ ला पं.उल्हास कशाळकरांचे अंधेरी येथे भवन्स कॉलेजात तालाब किनारे प्रियजनासमवेत गाणॆ ऐकण्याचे. पुर्ण चंद्रमा गगन बिराजे. त्या आधी पं. नयन घोष यांचे सतार वादन ही ऐकायचे आहे. ते सुद्धा मला आवडतात बर का . त्यांचे तबलावादन ही बऱ्याच वेळा ऐकले आहे हो.

अशी कोजागीरी आयुष्यात पहिल्यांदाच येणार आहे. चंद्र आणि मनोचंद्र दोन्ही ही मनोमनी खुलणार आहे.
चांदनी रात मोहब्बत मे हसी थी "फाकीर "
क्यो भाई, चांदनी रात तो मोहब्बत भरी है !

No comments: