जी पैठणी आवडते ती परवडत नाही, जी परवडते ती आवडत नाही. हे एक फार मोठे त्रांगड होवुन बसलय. आता ही पैठणी घेण्याची हौस (माझीच) बहुदा, मला येवल्याला घेवुन जाणार असे दिसते.
आज खास वेळात वेळ काढुन, "न्यु वेव्ह पैठणी " तर्फे रवीन्द्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथल्या पु.ल.देशपांडे कला अकादमीत पैठणींचे खास प्रदर्शन आयोजीत केले आहे, त्यास भेट दिली. घेण्याचाच विचार करुन. नो डाउट, किंमती बघीतल्यावर जीभ बाहेर आली, पण आता भाच्याच्याच लग्नात मावशीबाय ला महावस्त्र हवच.

त्रिमुर्ती पासुन हा प्रवास सुरु झाला. जवळजवळ रु. ३६,०००.०० ने सुरु झालेला हा निर्देशांक रु. ११,०००.०० पर्यंत आला आहे, पाहु अजुन किती खाली उतरतोय का ?
या प्रवासात आता पर्यंत अंदाजे ५००.०० रुपये प्रवासखर्चासाठी संपले असावेत. तिच्या भाच्याकडुनच वसुल करायला हवेत.
No comments:
Post a Comment