Thursday, October 18, 2007

जे जे उत्तम...

पुस्तक वाचतांना अनेकदा काही परिच्छेद आवडतात. डॉ. नरेंद्र जाधव यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक ’आमचा बाप आन आम्ही’ यातला उतारा. http://kathapournima.blogspot.com/ हा बॉग पहा.
---------------------------------------------------------------
त्या पुढे मला सुरु करायचे होते.
पिता पुत्रांच्या अशाही नात्यासंबधीची ही कथा.
मर्मभेद. लेखक शशी भागवत.
-----------------------------------------------------------------
दुसरा दिवस उजाडला तो साऱ्या सुर्यप्रस्थाच्या राजकारणाला प्रचंड हादरा देण्यासाठीच. कडेकोट पहाऱ्यात जागत असलेल्या प्रचंड आणि अभेद्य अश्या त्या अश्मदुर्गातुन युवराज कुणाल नाहीशे झाले होते.
एकामेकाच्या दॄष्टीस दॄष्टी भिडवुन दोघे पिता पुत्र कित्येक क्षण अनिमिष, अबोल अचल एकामेकासमोर उभे होते. दोघांच्याही नजरा तितक्याच कठोर होत्या. दोघांच्याही नजरेत एकामेकांविषयी तोच अविश्वास अभिप्रेत होता. आतापर्यंत शब्दांनी खाली गाडलेला एकामेकांविषयीचा संताप आणि तिरस्कार त्यांच्या नेत्रामधूनच चमक दाखवित होता.
तथापी, उद्वेग कॄष्णांताच्या नजरेत अधिक होता. पॄत्राने उद्धट्पणे पित्याच्या दॄष्टीस दॄष्टी भिडवुन चालविलेला हा अपमान कॄष्णांताचे ह्रुदय संतापाने, उद्वेगाने होरपळवित होता. शार्दुलसिंहाला त्याची जाणिव नव्हती असे नव्हे - पण आता तसल्या गोष्टींना भीक घालण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. पंख फुटल्याबरोबर त्याने उंच झेप घेतली होती ; आता आपले पाय लागणारे जग खाली खोल खोल कुठे तरी राहीले, या जाणिवेने घाबरुन परत फिरण्याची त्याची तयारी नव्हती. दोघेही पितापुत्र एकामेकांना जोखीत होते - तोलीत होते.
पित्याने पुत्राला प्रश्न विचारला त्याला आता बराच वेळ झाला होता. पुत्राने मात्र अद्याप त्या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नव्हते. उद्धटपणॆ उलट तो कॄष्णांताच्या डोळ्याला डोळा देवुन उभा होता.
एक दीर्घ निःश्वास टाकून महालाच्या मध्यभागी असलेल्या कोरीव पथ्यराच्या खांबावरुन कॄष्णांताने आपला हात काढुन घेतला.
"मी आपली आज्ञा घेण्यासाठी केव्हा पासुन तिष्ठ्त आहे, पिताजी महाराज ! शार्दुलसिंह आढ्यतेने म्हणाला.
"आणि मी देखील तुला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल ह्या अपेक्षेने तिष्ठ्त आहे. पुत्रा, युवराज कुठे आहेत ? " कॄष्णांताने पुत्राकडे रोखून पहात म्हणाला.
"आपला हा प्रश्न अपमानकारक आहे !"
"तुझी सध्याची वागणूक त्यापेक्षाही अपमानकारक आहे "
"युवराजांच्या नाहीशा होण्यामागे माझा हात आहे, असा भयंकर आरोप माझ्यावर करायचा आहे काय?"
"युवराज कुणाल कुठे आहेत ? " शार्दुलसिंहाने विचारलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन कॄष्णांताने पुन्हा विचारले.
"मला माहीत नाही !" प्रत्येक शब्द तुटकपणे बोलत शार्दुलसिंह जोराने म्हणाला, "पिताजी , आता मीच आपल्याला पॄच्छा करतो.युवराज कुणाल कोठे आहेत?"
उद्धटपणाचा हा अतिरेक होतो आहे ! " कॄष्णांत म्हणाला.
"आपल्या पाताळयंत्रीपणाचा तर केव्हाच अतिरेक झाला आहे ! " शार्दुलसिंह तिरस्काराने म्हणाला. संतापाने कॄष्णांताच्या मुखातुन शब्द उमटेनात.
पिताजी महाराज, शार्द्रुलसिंह पुढे म्हणाला, "पाताळयंत्री राजकारणाचा आपला कित्येक वर्षाचा अनुभव असेल ! पण शार्दुलसिंहाला राजकारण कळत नाही अशी जर आपली समजुत असेल तर ती चुकीची आहे, प्रथमपासुन आपण आपल्या पुत्रावर अविशास दाखवित आला आहात - आणि आताच्या आपल्या त्या प्रश्नाने अविश्वासाचा अतिरेक करता आहात. आपणाकडे प्रत्यही प्रेमाने, आदराने पाहात आलेल्या आपल्या ह्या पुत्रावर वरकरणी जरी आपल्या विश्वास असल्याचे दर्शवित होतात तरी आतुन आपण आपल्या पुत्राचा दुःस्वास करीत होतात. अगदी कालपर्यंत हे सत्य मला अज्ञात होते. आणि जेव्हा सत्याच्या विद्युत्पाचा पहिला प्रहर माला हादरवुन गेला तेव्हा अगम्य वाटणाऱ्या आपल्या कॄत्याचा क्षणार्धात उलगडा झाला. सर्व गोष्टी सुर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ दिसु लागल्या."
अंतर्मयी क्रोधाने फणफणणाऱ्या कॄष्णान्ताने तिरस्काराने म्हटले " स्वार्थाने अतिमहत्वाकांक्षी आणि अंध झालेल्या पोरा, असंख्य सुर्याच्या प्रखर प्रकाशातही एखादी गोष्ट तुला स्वच्छ दिसु शकेल की नाही याची मला शंका आहे. "
"आणि घनदाट अंधःकारात अंधालाही स्पष्ट दिसु शकणाऱ्या आपल्या कृत्यांवर प्रकाश टाकण्यासाठी एका तरी सुर्याची आवश्यकता आहे की काय, याची मला शंका आहे "
"शब्दच्छल पुरे"
" हा शब्दच्छल नव्हे. वस्तुस्थितीबद्दलचा तर्क आहे !"
"तो ही पुरे !"
का ? सत्य आपणास आताच भेडसावू लागले ?
( शेवटी )
"आपणास एकदमच सर्व गोष्टींची विस्मॄती पडाली काय ? महाराज , भरपुर तयारी करुन मी आपणाविरुद्ध बंड करण्याबद्द्ल मला आदेश दिला नव्हता काय ? "
"मला वाटते त्या बेतात बदल करण्याचा समय आता आला आहे"
तथापि, अद्याप मला तसे काही वाटत नाही, प्रणाम पिताजी महाराज !"
नाट्यपुर्ण प्रणाम करुन कुत्सितपणे हसतच शार्द्रुलसिंह महालाबाहेर पडला.
महालात राहीला तो एकटा कृष्णांत ... दुर चाललेल्या पुत्राच्या पाठमोऱ्या आकॄतीकडे पाहात ......... ! मानवी नेत्रातुन ओसंड्णाऱ्या क्रोधात जर तितके सामर्थ्य असते तर कृष्णांताच्या नेत्रातील विखाराने शार्द्रुलसिंह केव्हाच ठार झाला असता.
========================================
मी ही गोष्ट येथे खाली ठेवतो. शेकोटीजवळ रात्री गप्पागोष्टी करत बसलेली माणसे जशी मागचा धागा पकडुन खाली ठेवलेली गोष्ट पुढे सुरु करतात ती आपण करायची आहे.

No comments: