Sunday, October 21, 2007

प्रिय डॉ. शुभा राऊळ, महापौर,

प्रिय डॉ. शुभा राऊळ,
महापौर,
मुंबई,

सप्रेम नमस्कार,

दसऱ्याचा शुभेच्छा.
पुढच्या दसऱ्याला झेंडुच्या फुलांचे, हिरव्या पानांचे तोरण केवळ आपल्या दाराला लावण्या पुरते मर्यादीत न ठेवता, हि हिरवाई, हा बहार आपल्या साऱ्या मुंबई मधे लावण्याचा संकल्प आज सोडुया व त्या साठी आपण पुढाकार घ्यावात ही विनंती.

काल " हिरव्या बोटांची महापौर " हा आपल्या कार्याची ओळख करुन देणारा लेख चतुरा मधे वाचला. संवेदनाक्षम एक डॉ. आम्हाला महापौर म्हणुन लाभले हे मुंबईचे भाग्य आहे. पण आपल्या कडे एखाद्या शहराची जबाबदारी असलेला एकच पदाधिकारी असल्याची घटनामत्क तरतुद नाही, त्यामुळे अनेक मर्यांदाच्या रिंगणात राहुन महापौरांना आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीमधे काम करावे लागते. या कालावधीमधे एकाच्याच हाती विधायक कार्य होणे तसे कठीणच आहे.

आपल्या न्यूयॉर्क भेटीत आपल्याला तिथे ठायी ठायी दिसणाऱ्या ग्रीन झोन्सनी आकर्षीत केल्याचे वाचले, तिथे मुख्य रस्तावर झाडे नाहीत, तर रस्तांलगत ग्रीन पार्कस आहेत, दिव्याचा खांबावरही वेली सोडलेल्या आहेत, आणि दिव्याखाली झुडुपांच्या बास्केट्स ! आपल्या मते, मॉडॆल समोर ठेवावे ते समॄद्धी आणि हिरवाई जिथे संगतीने नादंते, अशा शहरच !

जर आपण, नागरीक व सरकारी यंत्रणा एकत्रीत आल्यात तर हे चित्र आपणही मुंबईत सहज साकार करु शकतो.

याची सुरवात आपण नर्दुंला टॅंक मैदानापासुन सुरु करु या का ? ही जागा बॄहन्मुंबई महानगर पालीकेच्याच मालकीची आहे. आपल्या बंगल्यापासुन पाच मिनीटाच्या अंतरावर आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या रोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर आहे.

शेजारच्या कोट्याधीश कि अब्जोपती देवाला ही आपण यात " स्वच्छ माझे अंगण " या योजने अंतर्गत सामील करु शकतो.

खास आपल्या निदर्शनास आणण्यासाठी या मैदानाची सध्याची दुरावस्ता सांगणारे फोटो काढले आहेत.

आपल्या नम्र,

लिहीणार - आपल्या शहरासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा.

No comments: