Saturday, October 20, 2007

गोडबोले स्टोअर्स तसेच पैठण्यांचे प्रदर्शन

दो दिवाने शहरमे, रानडे रोड पर, पैठणी ढुंडते है ! रानडे रोडवरील वैभब हॉल मधे पैठण्यांचे प्रदर्शन भरल्याचे वाचुन मोरु, मोरुच्या बायकोला म्हणा, बाई ग, ऊठ तयार हो, आज आपल्याला पैठणी आणायला जायची आहे. मोरुचीच बायको ती, दुसऱ्या क्षणी तयार, उगाचच तीची सासु तिला नाव ठेवत नाही, "भटकी, अक्खा दिवस भटकायला पाहिजे " म्हणुन !
खर म्हणजे तिचे हे एक जंक्शंनच झालेले असते, नवरा म्हणतो , अक्खा दिवस घरकामातच गुरफटलेली असते म्हणुन आणि सासु ?
पैठणी काही फारश्या भावल्या नाहीत, मग आपला नेहमीचा उपक्रम सुरु झाला, रानडे रोड वरुन, जवळपासच्या गल्ली, कुच्यातुन, फेरफटका मारायच्या. या प्रकारात प्रत्येक वेळी नविन जागा, ठिकाणे गवसत जातात. आज आमच्या समोर अवचीत आले ते डि.एल.रोड वरील "गोडबोले स्टोअर्स "

त्यांना वेध लागले आहेत ते दिवाळी फराळाचे. आपली सर्वांची दिवाळी लज्जतदार, चवदार, खास बनवण्यासाठी त्यांची लगबग चालु झाली आहे. दिवाळीच्या फराळाची आगावु मागणीची नोंदणी सुरु झाली आहे.
आकर्षण म्हणजे"अमेरिकेतील नातेवाईकांकरिता घरपोच फराळ हॅंपर पाठवले जाईल "
सद्ध्या पुरते अनारसे व शंकरपाळे घेवुन झाले.

No comments: