"महाराज महाराज, आधी अभय द्या "
"दिले- पुढे बोल"
"महाराज महाराज पडला, पडला"
"अरे , पाऊसना , तो १० जुनला पडायचाच होता, वेधशाळेचा अंदाज खरा ठरला म्हणायचं. "
"नाही नाही महाराज , तो पडला तो पडला ’
"आपल्या शेयरचा भाव ना, तो पण पडायचाच होतो "
"नाही नाही महाराज ,विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला उमेदवार पडला "
महाराजांनी एक मंद स्मित केले.
विधान परिषदेच्या आमदारकीत अशी कोणती जादु आहे की ज्यासाठी घोडाबाजार मांडला जातो,
अशी कोणती त्या जागांमुळॆ मलई मिळते ( Return of Investment ? ) की त्यावर उमेदवार निवडुन आणावा कोट्यावधी रुपये खर्च केले जातात .यासाठी १०० कोटीची उलाढाल झाल्याचे वर्तमानपत्रात वाचनात येते. कशासाठी आमदारांचा पंचतारांकीत हॉटॆलमधे अज्ञातवासात (?) पाहुणचार केला जातो ?
No comments:
Post a Comment