राजाभाऊंची नजर कशी, .खाली मुंडी खाणे धुंडी , त्यात उपहारगृहांपेक्षा घरगुती खाणे मिळण्याचे ठिकाण असेल तर ? वा क्या कहना. त्यांच्याचानी आपल्यावर ताबा ठेवणॆ फार त्रासदायक ठरते.
आज ठाकुरद्वारी , मुगभाटाच्या नाक्यावर एक मस्त खाद्यठिकाण गवसले.
" समाधान स्नॅक्स."
मिसळ उत्तम होती, राजाभाऊंच्या बायकोला तिथले पॅटीस ( बटाटयाचे सारण असलेले ) भावले , तर पुतणीने मुंगडाळ भजींवर ताव मारला.
त्या दोन महिलांनी गेल्याच आठवड्यात या खाद्यमहोत्सवाची सुरवात केली आहे. सकाळच्या नास्तापासुन ते रात्रीच्या पोटभरणी पर्यंत.
छोटेखानी दुकान. पण समाधानाची गॅरंटी.
No comments:
Post a Comment