Sunday, June 13, 2010

सिल्क फॅब - मुंबई

ही पोष्ट वाचणाऱ्याने आपल्या जोखमीवर व स्वःताच्या जबाबदारीवर वाचावी. हे वाचल्यानंतर जर कोणी भरपुर खर्च झाल्याची तक्रार केली तर ती ऐकली जाणार नाही, आपल्याच बायकोने हट्ट केला आणि नवऱ्याने तो न पुरवल्याबद्दल घरात भांडणे झाली तर या सर्वास राजाभाऊ वैयक्तीकरीत्या जबाबदार नाहीत.

राजाभाऊंना वाटले, आपण आपल्या बायकोपेक्षा स्मार्ट. आपल्या बायकोला आवडलेले बिहारच्या स्टॉलवरुल टसर सिल्क चे ड्रेस मटेरीयल आपल्याला आवडले नाही असे दर्शवायचे ,नको गं, खुप महाग आहे, गेल्याच वर्षी तुला कांथा सिल्कची साडी घेतली , परत नको, करत दहापंधरा ठिकाणी तिला फिरवत नाराज करायचे व बघ मी तुझे सारे ऐकतो, तुजे मन राखणॆ माझ्यासाठी खरं करत ते विकत घ्यायचे, बायको खुष तर राजाभाऊ खुष.

पण हा डाव राजाभाऊंच्या चांगलाच अंगाशी आला. या बायका मोठ्‍या हुशार, नवऱ्याला कसे उल्लु बनवत पटवायचे हे बरोबर जाणुन. या दहापंधरा स्टॉलच्या खेळात वाराणशीच्या स्टॉलवर आवडलेले ड्रेस मटेरीयलपण तिने आपल्या पदरी पाडुन घेतले.






वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेडला सालाबाद प्रमाणॆ यंदालाही "सिल्क फॅब " हे भारतसरकार वस्त्र उद्योगालय आयोजीत सिल्कच्या साड्‍यांचे प्रदर्शन भरले आहे. देशाच्या विविध राज्यातुन सहकारी संस्था येथे आपला माल विकायला आलेल्या आहेत.

खरं म्हणजे आज राजाभाऊ येथे ओडीसी घेण्यासाठी गेले.

पण.

No comments: