कॉपर चिमनी, वरळी , मुंबई
आज प्रथमच राजाभाऊंना आपण आपल्या आवडीच्या मरिन प्लाझा मधल्या बे व्हु मधे बुफे खायला जावु नये असे वाटत होते, सतत उठायचा कंटाळा येतो, त्यात परत सोबत म्हातारी माणसे, त्या ऐवजी मस्त पैकी कॉपर चिमनी मधे जावुन शांतपणे मोघलाई जेवणाचा आस्वाद घ्यावा असे त्यांचे मत झाले.
कॉपर चिमनी, उत्कॄष्ट, चविष्ट, अस्सल मोघलाई खाना मिळण्याचे मुंबईमधले फार पुर्वी पासुनचे ठिकाण. जवळजवळ १८-१९ वर्षापुर्वी ते तेथे जेवायले गेले होते. त्या वेळी त्यांचे जेवण एवढे आवडले होते की आपण येथे नेहमी जेवायला यायचे असा त्यांनी ठाम निश्चय केला होता. हे सतत जायचे प्रकरण मधे इतका कालावधी लोटल्या नंतर अखेरीस साजरे झाले.
सुरवात झाली ती टॉमेटो सुप नी. त्या पाठोपाठ मागवले गेले ते आलु चटणीवाला व मकई मलाई शीग कबाब, मस्त पैकी त्या हिरव्या चटणी सोबत.
मुख्य जेवणात त्यांनी दम आलु व मलई कोफ्ता मागवला , सोबत ड्राय फुट्र्स व फळे भरलेला काबुली नान.
मजा आली. बऱ्याच दिवसाने चांगले जेवल्याचे समाधान मिळाले.
आज पंचाहत्तरीला पोचलेले आजोबा खुष झाले.
No comments:
Post a Comment