Wednesday, June 09, 2010

हाईट , लिमीट वगैरे वगैरे

संध्याकाळी सुरु केलेल्या मुंबई - पुणे प्रवासाने नेहमी प्रमाणेच ५-६ तास घेतलेले. वाकडवरुन पुढे दरमजल करत वहाने बदलत पुढे जातांना नेमकी शेवटाची बस डोळ्यासमोरुन निघुन गेलेली, मध्यरात्र उलटुन गेल्यानंतर नकोसे झालेले हातातले जड सामानाचे ओझे आणि शरीराचा भार भुकेल्या पोटी वहात वहात , तंगडतोड करत , पायी चालत चालत, भटक्या  कुत्र्यांचा सोबतीने इमारतीच्या पायथ्याशी पोचता, हुश्श करत , पोचलो एकदाचा ह्या समाधानाने सुखावत उद्दवहानाची कळ दाबता, हाय रे  देवा, सारे नकोसे होवुन संतापाने, अगतिकपणे कपाळावर जोरात हात मारता,

"ही लिफ्ट आत्ताच बंद पडायला हवी होती ? "

नशिबात लिहिलेले सात मजले चढुन घरी पोचता, 

"हे भगवान , घराची चावी विसरलो "  

1 comment:

Gouri said...

hote ase kaahi vela ... its just not your day :(