Tuesday, June 08, 2010

इंद्रायणी, शिवाजी नगर आणि मृत्युचे आमंत्रण

आधीच फलाट आणि ट्रेन यांच्यामधे माणुस आत सहजच पडावा, खाली रुळाखाली जावा येवढे अंतर ( सुरक्षितता म्हणजे काय रे भाऊ ? ) , त्यात इंद्रायणी, सोलापुर पर्यंत जाणारी  इंद्रायणी, फक्त दोन-चार मिनिटे शिवाजी नगरला थांबणारी इंद्रायणी, या येवढाश्या कमी वेळात आतली माणसं उतरणार, प्रवासी वर चढणार. त्यात आपण सारे बेशिस्तीचे.

या सावळ्या गोंधळात ट्रेन सुरु होते, धावती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात, त्या चालत्या गाडीत  बायको, मुलांना चढवण्यात,  किंवा आपल्या म्हाताऱ्या बायकोला आधार देत वर चढवता चढवता एखादे म्हाताराम्हातारी, मुले , अर्धे प्रवासी आत, अर्धे बाहेर राहीलेले  खाली फलटावर पडतात, सुदैव त्यांचे ते फलटावरच पडतात, त्या गॅपमधुन खाली रुळावर पडुन गाडी खाली सापडत नाहीत.

No comments: