"तरी मी सांगत होतो , अजुन पाऊस धडपणे पिकलेला नाही, थांब, थोडॆ दिवस थांब, मग जावुया. पण तुला जरासुध्दा ऐकायला नको "
चवताळलेले राजाभाऊ.
बायकोने कधी आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकले आहे का मग ते आज ऐकले जाईल.
बायकोने कधी आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकले आहे का मग ते आज ऐकले जाईल.
संपुर्ण रस्तात एकही पावसाचा म्हणुन थेंब अंगावर झेलणॆ नाही. सारे धबधबे कोरडॆठाक.
मदमस्त , रौद्रसरुपी वैतरणा नुसती रोडावलेली.
त्यात भरीस भर म्हणुन कसाऱ्यापर्यंत मागुन येत असलेल्या दुसऱ्या गाडीच्या चालकाने कसाऱ्यावरुन डावीकडॆ विहीगावकडॆ गाडी वळवल्यानंतर काही कळण्याच्या आत अचानक जी भरधाव सोडली ती थेट खोडाळ्यापर्यंत. जरा देखिल थांबण्याचे नाव नाही. मग त्याला गाठण्याच्या नादात विहीगावात धबधब्याकडॆ झालेले दुर्लक्ष, वैतरणा पुलावर थांबण्याच्या, पुढे असलेल्या कॅनन्समधे उतरायच्या या सर्व सर्व बेतावर त्या गृहस्थामुळे पडलेले पाणी.

सारे वर्षे आपल्या बायकोला व मुलाला या भागातले सारे निसर्गसौदर्य न्याहाळायला केव्हा एकदा घेऊन जातो करुन आतुरतेल्या राजाभाऊंचा सारा विरस त्याने केला. तरी त्यांना बजावुन सांगितले होते, माझ्या मागे गाडी ठेव म्हणुन, हा सारा परिसर माझ्या माहितीतला आहे.
खोडाळा ते देवबांध - देवबांध ते मोखाडा , मोखाडा ते जव्हार , जव्हार ते विक्रमगड , सारा परीसर नितांत सुंदर आहे. लॉग ड्राईव्ह साठी सर्वोत्तम.
सारा रस्ता उत्तम दर्ज्याचा आहे.
तरी बरे थोडाफार पाऊस पडुन गेल्याने सारी धरती हिरवीगार झालेली.
आता परत एकदा या विभागात ऑगष्ट मधे.
No comments:
Post a Comment