Thursday, August 26, 2010

मेंदी आणि पानगळ.

आज सकाळीच एकीच्या ब्लॉगवर "मेंदी" वरचा छान लेख वाचला , थोड्याच वेळात फेसबुकवर परत "मेंदी".

अरे काय आहे तरी काय ? आज किती वेळा मेंदी दिसणार ?

ही मेंदी फार फसवी हो, फार मायावी. भल्याभल्यांना भुलवणारी, भल्याभल्यांना घायाळ करुन सो्डणारी.

त्याचे असे झाले.

कछुए : इतिजार हुसैन
पुस्तक - मोरनामा आणि इतर कथा
कथा-निवड, प्रस्तावना आणि अनुवाद भास्कर लक्ष्मण भोळे. मधुन साभार.

"आदल्या दिवशी तो पुन्हा त्याच गल्लीत गेला आणि त्याच दरवाजावर त्याने टकटक केली. पुन्हा कोमल पावलांची तीच देवडीवर आली आणि पुन्हा त्याने झुकलेल्या नजरेने भिक्षापात्र पुढे केले आणि तो भिक्षा निघुन गेला. हाच त्याचा नित्यक्रम होता. कितीतरी दिंडी -देवड्यातुन कितीतरी स्त्रियांच्या हातून त्याने भिक्षा घेतली होती पण कधीही नजर वर उचलून कोणाकडॆच पाहिले नव्हते. त्याने हे ओळखले होते की पंचद्रियांपैकी डोळेच जास्त पापी असतात, जे काही दिसते ते मायाजाल असते. ......

तो वसंत पंचमीचा दिवस होता.

आज पुन्हा त्याने त्या दरवाज्यापुढे जावुन कडी वाजवली आणि पुन्हा कोमल पावलांची ती देवडीवर आली. पण आज पावलांना मेंदी लावलेली होती, त्याने झुकलेल्या नजरेने त्या पावलांना पाहिले आणि विस्मित झाला की गोऱ्या पावलांना मेंदी काय लावली जाते आणि पावलांचे रूप कुठल्या कुठे बदलून जाते. थक्क होवुन तो त्या मेंदीभरल्या कोमल पावलांकडॆ नजर खिळवून होता. त्याला भानच नव्हते की त्याला भिक्षा घ्यायची आहे.

"भिक्षुजी , जरा लवकर , सणावाराचा दिवस आहे", आणि पहिल्यांदाच ऐकलेला हा आवाज कानावर पडल्याबरोबर भिक्षापात्रासवेत त्याची नजरही वर गेली आणि ती वरच राहिली. किती मोहक मूर्ती होती. ......

तो भान विसरुन , टक लावुन तिच्याकडॆ पाहात राहिला....

मनाला एकच चिंता लागून होती ’ मला मोहाने घेरले आहे की काय ? "

आणि नगराकडे पाठ फिरवून तो अरण्याच्या दिशेने निघाला.

संजय आता घनदाट अरण्यात फिरत होता. चालताचालता त्याने फुलुन आलेला अशोकवृक्ष पाहिला आणि तो थांबला. ......

या अशोकाला त्या मेंदीभरल्या, गोऱ्या, कोमल पावलांनी तर ठोकर मारली नसेल ?

मोहाच्या जाळ्यातुन बाहेर पडण्यासाठी संजयनी पुन्हा एक प्रदीर्घ भ्रमंती केली.

मग आला, पानगळीचा ऋतु.

तिथेच एका गर्द पिंपळाच्या सावलीत आसन मारून बसला आणि पडणाऱ्या पिवळ्या, सुकलेल्या पानांकडॆ बघत राहीला - पानगळीची पाने, अगणित सत्ये. एका स्थंभित अवस्थेत तो पडत्या पानांना पहात होता, पहात राहिला. हळूहळू त्याचे डोळे मिटत गेले - "जे बाहेर आहे तेच माझ्या आतही आहे " आसन घालून, डोळे मिटुन बसून राहिला, बसून राहिला ...... न जाणे किती दिवस, किती युगे.

तो जागा झाला.

तो आपल्या शांत-शीतल मनात डोकवला - "माझ्या  वासनाही फिक्या सुकलेल्या पानांप्रमाणे झडून गेल्या आहेत.  फुलं झडतात, गंध उडुन जातात, फांद्या सुकुन जातात. पण पानगळ अमर आहे.

आता तो शांत होता. मन म्हणाले की माझी यात्रा सफल झाली " आता मला परत जायला हवे. "

संजय अरण्यात येताना एक रिकामे पात्र आणि अस्वथ मन सोबत घेऊन आला होता. भरलेल्या मुठीने आणि शांत चित्ताने तो अरण्यातून परतला.

डोळे उचलून त्याने हेही नाही पाहिले की तो कोणत्या गल्लीतून चालला आहे, आणि कोणत्या दारी भिक्षा मागतो आहे. कशासाठी पहायचे, भिक्षा मिळाली की झाले. कोणत्या दारी आणि कोणत्या हातांना भिक्षा दिली जाते याच्याशी संन्यासाला काय करायचे आहे ? झुकलेल्या डोळ्यांनी फक्त देणारीच्या पावलांना पाहिले आणि ते डोळे विस्मयचकीत झाले.

अगदी तशीच गोरी, मेंदीभरली पावले ........... "

मूळ कथा - पत्ते (पानगळ )
कछुए : इतिजार हुसैन
पुस्तक - मोरनामा आणि इतर कथा
कथा-निवड, प्रस्तावना आणि अनुवाद भास्कर लक्ष्मण भोळे. मधुन काही भाग साभार.



4 comments:

Rishikesh said...

खूप छान आहे. आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी धन्यवाद !!!



तुम्हाला एक गंमत सांगतो. सुकेळी या विषयावर मी काही मिळतंय का ते पाहत होतो. काहीच सापडलं नाही. फक्त तुमचा लेख आणि सुकेलीळींचा फोटो! कोकणात खाल्ली होती, तेंव्हापासून कृतीसाठीही तडफडत होतो! तर त्या सुकेलीळींसाठीही धन्यवाद!!!!

Unknown said...

Siddharth -gautam buddha chi aathavan aali postwarun...

HAREKRISHNAJI said...

बरोबर आहे. ही जातक कथा आहे.

HAREKRISHNAJI said...

बरोबर आहे. ही जातक कथा आहे.