Saturday, August 07, 2010

पुन्हा एकदा कदंब

हा कदंब परत एकदा भेटला तो "ऋतुसंहार’ मधे.

श्री,ज्ञानेस्वर कुलकर्णी यांनी कालीदासाच्या "ऋतुसंहार" चे मराठीत छानसा अनुवाद केला आहे. त्यामधे ते लिहीतात,

शुभ्र कमलांची आभा असलेल्या मेघांनी
ज्यांच्या पाषाणांना चुंबिले आहे
असे हे पर्वत,
सगळीकडॆ खळाळणाऱ्या जलौघांनी
व नर्तन करणाऱ्या मयूरांनी
गजबजुन गेल्यामुळे
विरही जनांना अस्वथ करीत आहेत.

कदंब, सर्जा, अर्जुन व केतकी
यांच्या फुलांनी सुगंधीत झालेला
व जलतुषारांनी भरलेल्या मेघांमुळे
शीतल झालेला
हा वायू,
कोणाचे बरं चित्त चाळवणार नाही ?

आज आपल्या केसातं गुंफताहेत अंगना
माला नवपुष्पांच्या,
बकुल फुलांच्या,
कदंबकळ्यांच्या, शुभ्र केतकींच्या.
आणि लावीत आहेत कानांवर
मनाप्रमाणॆ कर्णभुषणे ककुभकुसुमांची

नूतन जलधारांच्या वर्षावाने
उष्मा नाहिसा केलेला
हा वनप्रदेश
प्रमुदित झाला आहे
कदंबांच्या नवांकुरांनी;
नर्तन करीत आहे
वाऱ्यांनी हलणाअऱ्या शाखांनी;
हासत आहे केतकेच्या नवकोंबांनी.

मेघांचा समुदाय असलेला हा वर्षाकाल
वधूंच्या केसात माळत आहे
एखाद्या प्रियकराप्रमाणॆ.
जुईच्या कळा व उमललेली फुले,
आणि मालती-बकुल फुलांची माला,
कर्णभुषणॆ म्हणून लावीत आहे कानांवर
नवजात कदंबाची फुले.
श्री,ज्ञानेस्वर कुलकर्णी यांनी कालीदासाच्या "ऋतुसंहार" चे मराठीत छानसा अनुवाद केला आहे. त्यातले हे श्लोक.

No comments: