Friday, August 06, 2010

नीपं दृष्टवा हरितकपिंश केसरैरर्ध्रुढै - आणि चूडापाशे नवकुरबकं चारु कर्णॆ शिरीषं, कादंबाचा बहर लुटतो वर्षबिंदु घनाचा

तर हा असा कदंब. 
कैकवेळा त्याला पाहिलेला. फुललेला, बहरलेला, स्वतःच्या तालात नादवलेला. 

लोकरंग मधे अपर्णा मोडकांचा लेख वाचल्यानंतर त्याची खुणगाठ पटली. 
मग तो कदंब भेटला शरदिनी डहाणुकर लिखीत "नक्षत्रवृक्ष " मधे. 
त्याचे सौदर्य मग खुलुन उठले ते मेघदुतात.   

मेघदुताचा  नीरा वैद्य, पद्मा कुलकर्णी, अनुपमा कुलकर्णी आणि मृदला गडनीस यांनी सुंदर भावानुवाद केलेयं. 

कदंबाबद्द्ल कालीदास लिहीतात ,

भुंगे कदम्बच्या अर्धस्फुट फुलातील हिरवट पिंगट केसर पाहुन, हरीण नदीकाठी पानथळीवरेल कर्दळीला प्रथमच आलेल्या कळ्या मोठ्या चवीने खावुन आणि हत्ती अरण्यातील तप्त भूमीतून येणाऱ्या मृदुगंधाचा घमघमाट हुंगुन तुझा मार्ग जाणतील.

आता तू पुढील मार्गावर लागलेल्या "नीचेः" नावाच्या पर्वतावर विश्रांती घे. पर्वतावरील कदम्ब वृक्षांची फुले तुझ्या पहिल्याच वर्षावाने एकदमच फुलतील. पर्वतभर फुललेली ही फुले तुझ्या स्पर्शाने पर्वतावर आलेल्या रोमांचाप्रमाणॆ दिसतील, या फुलांचा मदिरगंध पर्वतभर पसरलेला असतो, त्याचाच परिणाम म्हणून की काय या पर्वतावरील गुहांमधे वारांगना आणि विलासी नागरीक यांचा धुंद आणि उत्शॄखंल प्रणाय रंगतो. चोरट्या प्रणयाचा रतीपरिमल आसमंतात पसरलेला असतो. 

तुझ्या आगमानाने फुलणाऱ्या कदंबापुष्पांनी त्या आपला भांग सजवतात, कोमल , केसरमय , गोंडस शिरीषकुसुमांना श्रुंगारात कर्णाभुषणे स्थान असते. 

"सुश्लोकमेघ’  मधे रा.चिं.श्रीखंडे लिहीतात 

पुष्पे कदंबा हरिताभ पीत पाहोनि, ज्या केसरही न पूर्ण,
सरित्तटी ओलिंत कंदलीना आल्या कळ्या त्या पहिल्या गिळून,
वनांतरीच्या क्षितिच्या सुगंधां आस्वादुनी त्वत्पथ ये कळोनी - 
भृंगा, कुरुंगा, वनिच्या मतंगा परोक्ष गेलासि गळोनी  !

विश्रांतीसाठी वस तेथ मित्रा ! नीचैः प्रथा ज्या गिरीलागि होत
त्वन्मीलनें फुल्लकदंबरुपे तो प्रेमरोमांचितस्त्राचि मूर्त !
वारांगनांच्या रतिगंधयोगे ज्याच्या गुहा उत्कट दर्शवती
की यौवने तेथील नागरांची उद्दामता केवढि ती धरती !

लीलांबुजे , जेथ, कर स्त्रियांच्या, केशात कुंदे माळलेली
पराग लोध्रांतरिंचे पडोनी त्यांची मुखश्री धवलत्व ल्याली.
कोरंटिही भूषवि केशपाशां, कर्णांवरी शोभतेसे शिरीष
तैशी तुज्या आगमिचीं कदंबे भांगात त्यांच्या सजती विशेष !

याच कदंबाबद्द्ल द.वि.पंडीत यांनी जो मेघदुताचा अनुवाद केला आहे त्यात ते लिहीतात,

खाई कंद प्रथम फुलले गंध घेई धरेचा
कादंबाचा बहर लुटतो वर्षबिंदु घनाचा
पुण्यांशाचा तव सुचीविला मार्ग तद्विक्रमांनी
सारंगानी मृगगजालीचातकादि क्रमांनी ॥

नीचैश्शेल श्रमहर तिथे थांब विश्रांतिसाठी
त्वत्संयोगे गंहिवर तया नीप-पुष्पेच मोठी
वारस्त्रीच्या रतिपरिमळे धुंदशा गव्हरी तो
उतूं हाते तरुणपण तें गांवचे दाखवीतो ॥

ताजीं पद्में मिरविती करी लाविती कुंदवेणी
घेती लोध्रोद्ववरजवळे गौरता गौरवोनी
वेण्यांमधे कुरबक नवे कर्णभागी शिरीष
त्वकादंबे सजविति वधू रम्य सीमन्तदेश ॥

No comments: