कह दो कोई पियासे घुमने जाये.
मनमुराद वर्षावर्षाव झेलण्यासाठी, हिरवाईने नटलेल्या सृष्टीचे डोळ्याचे पारणॆ फेडणारे वैभव न्याहाळायला जाण्यासाठी , झऱ्याचे पाणी पित आपली तृष्णा शमावण्यासाठी राजाभाऊ जेवढे आतुर झाले होते तेवढीच ती अनात्सुक. ते म.रा.प.म. च्या बसनी प्रवास करणॆ, ती पायपीट तिला नकोशी झालेली.
मग राजाभाऊंनी एक अप्रतिम स्थळ शोधुन काढले, पुण्याजवळील पौड-कोळवण्याच्या पुढे हडशी गावात असलेले " श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र ". एक निसर्ग्यरम्य लावण्यमयी जागा.
चांदणी चौकात १५-२० माणसे कोंबंकोंबलेल्या जीपातुन आता कसा प्रवास करायचा ह्या विचारात पोटात आलेला गोळा. तेवढ्यात समोरुन कोळवणची आलेली बस.
मस्तपैकी पावसाने ताल धरलेला, सारे सारे कसे भारलेले , जेथवर लक्ष जाईल तेथ पर्यंत फक्त हिरवा आणि हिरवा रंग, नाना छटा घेवुन राहिलेला, आल्हाददायक वातावरण, डोंगरमाथ्यावर धडका देत , तो व्यापुन झाकुन टाकलेले मेघ, अवखळ झरे, आणि हाडह्सी गावातुन क्षेत्राकडॆ जाणारा छानसा छोटासा नीटनेटका छानसा घाट, दुतर्फा लावलेले कल्पतरु आणि आमराई, तो तिथला खालच्या अंगाला दिसणारा तलाव, तो धबधबा , बस्स और क्या चाहिये जीने के लिये.
हिरवी, ओली , गार हवा , मोकळ्या हवेतील प्राणवायु
नाही नाही हे सारे पेलवत, मुंबईमधे रहाणाऱ्या माणसाला.
यहीं बहार है यही बहार है दुनीया को भुल जाने की, खुशी मनानेनी
ये प्यारे प्यारे नजारे ये थंडी थंडी हवा, ये हल्का हल्का नशा
निकलगे आ गयी रुत मस्तीया लुटानेकी, खुषी मनानेकी.
वर पोचलो सारे दृश्य पालटले, नीटनेटका मंदिराचा परिसर, सुरेख देवालय, सभोवतालचे गवतांनी आच्छादलेले गवती कुरण, त्यात बसण्यासाठी केलेल्या घुमटी.
मन प्रसन्न झाले.
आणि प्रसन्न झालेले मन आणखीन खुष झाले ती समोर आलेली गरमागरम कांदा भजी आणि वाफाळलेली कॉफीचा स्वाद घेतांना. बाहेर रपारपा पडणारा पाऊस, गरमागरम कांदा भजी आणि सोबत ती. तिचा हवाहवासा वाटणारा सहवास. ( लग्नानंतरच्या इतक्या वर्षाने देखील ??? )
पायी पायी खाली उतरतांना तर !!
No comments:
Post a Comment