Sunday, August 01, 2010

बंद आणि गॅल्पस आणि विनय हेल्थ होम

तर हा बंदचा प्रकार राजाभाऊंना फार भावला.
पुढचा शनिवार. मुंबईमधे मुसळधार पाऊस नुसता कोसळुन राहिलेला, त्यात राजाभाऊ मुलासाठी लॅपटॉप घेण्यासाठी सकाळीच सहकुटुंब, सहपरिवार बाहेर पडलेले.
या पावसाळी बढीया माहोल मधे कुठे जेवायला जायचे , अश्या ठिकाणी की जिथे बसुन पाऊसाची मस्तपैकी मजा लुटु शकु, ज्या जागी बसल्याबसल्या बाहे रपारप बरसणारा पाऊस, सर्वत्र छायी हुवी हरीयाली,  ज्याच्या व बाजुची घराच्या दगडी भिंती साऱ्या साऱ्या वेलीने आच्छादलेल्या, जेथे जेवण अत्यंत चविष्ट मिळाते , छानसे बंगलेवजा रेस्टॉरंट असावे. तर राजाभाऊंना एक नाव त्वरीत आठवले, अशी ही जागा जी त्यांची फेव्हरेट होती. 

मुंबई रेसकोर्स मधे "गॅल्पस" नामक एक रेस्टारंट आहे जेथे मोघलाई व कॉंटीनेंटल पदार्थ पार चवदार मिळतात, असे एक ठिकाण ज्याच्या आतबाहेर सगळीकडॆ घोडे , घोड्याच्या शर्यतीने भारलेले.

बाहेरील कोसळणारा पाऊस पहात , मैदानात वाढलेल्या हिरव्यागार गवताने मनाला तोशीवले, शरीराची भुक ती तर गॅल्पस मधल्या जेवणाने भागवलेली.

रात्र झाली. राजाभाऊंच्या मुलाचे परत फर्माईश चॅनल सुरु झाले, तिखट, चटकदार, गरमागरम मिसळपाव खायला जाण्याची त्याची इच्छा मग त्याच्या बापाने त्यांना फणसवाडीच्या नाक्यावर असलेल्या "विनय हेल्थ होम’ मधे नेवुन पुरवली. त्यांछ्या साठी पातळभाजी पाव, त्यांच्या बायकोने मागवला साबुदाणा वडा , जो ती केवळ त्या सोबत मिळणाऱ्या चटणीसाठी , जिच्यासाठी ती जीव टाकते, व मुलाने दहीमिसळ मागवली.


No comments: