Sunday, August 01, 2010

बंद आणि सयाजी, गोडवा, जगात भारी कोल्हापुरी आणि उमीया कच्ची दाबेली

बंद म्हणजे साफ बंद. राजाभाऊंच्या बायकोनी त्यांना निक्षुन सांगितले.

राजाभाऊंनी मनाशी विचार केला, बंद काय फक्त विरोधी पक्षांनीच पाळायचा असतो ? कधी तरी (की नेहमीच ) एखाद्या दिवशी सत्ताधारी स्वामिनीने पाळला तर काय बिघडले.

पण हा लाक्षणीय बंद जेव्हा दोन दिवस पाळायचे ठरवले ना तेव्हा मात्र जरा काळजी वाटायला लागली, कसे काय आता निभवणार ? दोन दिवस स्वयपाकघर बंद म्हणजे जरा अतीच.

दिवस पहिला.

बंदची सुरवात भरल्यागच्च पोटांनी, थाटात व्हायला पाहिजे करुन मग ते वाकडला नव्याने आलेल्या सयाजी मधे बुफे जेवायला गेले.  पुण्यामधे चांगल्या बुफे जेवणासाठी सयाजीचा क्रमांक फार वरती लागायला हरकत नाही. फार अगत्यशील कर्मचारीवृंद, छानशी जागा, आणि चविष्ट , नाना प्रकार असलेले जेवण, स्टार्टस, सॅल्डस, कॉन्टेनेंटल पदार्थ, बिर्यानी पासुन सर्वकाही आणि हो भरपुर वेगवेगळ्या प्रकारची डॆसट्‌र्स ( राजाभाऊ फक्त डेसर्टसच खायला जातात हे त्यांच्या आकारमानावरुन नक्की कळुन येते ), हे सारे अवघे रु. ३७५ मधे आनि वर परत कॉरपोरेटसमधे काम करणाऱ्यांसाठी १० % सवलत. मजा आली.

रात्री मात्र बाहेर पडायचा कंटाळा आला, मग ते रहात असलेल्या गृहसंकुलातील "गोडवा" मधे वाग्यांचे भरीत व भाकरी खायला गेले.


दिवस दुसरा.

स्थळ ’जगात भारी कोल्हापुरी " मधे अख्खा मसुर ची,  कोल्हापुरची एक फाकडी भाजी खायला, सातारा रोडवर, सीटी प्राईड समोर गेले, सोबत ही भली मोठी रोटी, भरपुर मस्का मारलेली.

अख्ख्या मसुराची भाजी आणण्याआधी त्यांच्या समोर एका छोटाश्या वाटीत  चव घायला म्हणुन , किती तिखट भाजी हवी हे जाणुन घेण्यासाठी थोडीसी भाजी आणुन दिली गेली.

रोटीचा आकार बघुन दडपलेल्या जीवास शांत करण्यासाठी मग "खुस्का राईस " हादाडला गेला.

आता तरी बंद मागे घे या विनंतीला पहिला मोडता घातला गेला तो त्यांच्या सुपुत्रा कडुन, त्याला म्हणॆ नवसह्याद्री मधे "उमीया कच्छी दाबेली " मधे दाबेली खायला जाण्याची इच्छा झालेली.

वारजेल्या रहाणाऱ्या एक बाई, येथे नवसह्याद्रीमधे जे गणेश भेळीचे दुकान आहे त्याच्या कोपरय़ावरुन जरापुढे वळले की डाव्या हाताला, चितळे बंधुंच्या जरा पुढे दाबेलीचा स्टॉल लावतात. फार चांगली येथे कच्छी दाबेली मिळते.

बंद यशस्वीरित्या पार पडला. सर्व जणांचे त्याला चांगले सहकार्य मिळाले.


No comments: