Tuesday, August 24, 2010

श्रावण - सरहद के इस पार

आता पर्यंत वाटत होते की केवळ सरहद के इस पार असलेल्यांनाच, आलेल्यांनाच झळ लागलेली आहे , केवळ आपलीच माणसे होरपळुन निघाली आहेत या फाळणीमुळे. तसा समज झाला होता खरा.

पण तो गैरसमज नाहिसा झाला एक पुस्तक वाचत असतांना.

"जे ते हरवुन गेले "- मोरनामा आणि इतर कथा - अग्रगण्य पाकिस्तानी लेखक इंतजार हुसैन - कथा-निवड , प्रस्तावना आणि अनुवाद - भास्कर लक्षण भोळे.

"मी जर खरोखरीच जहानाबादहून निघालो असेन तर मला फक्‍त एवढं आठवतं की पावसाळा ऋतु उलटला होता आणि कोकीळा आंबरायांमधून निघुन गेलेली होती, आणि आमच्या अगंणातल्या निंबावर टांगलेला टांगलेला झोका उतरला गेला होता. " हे सांगता सांगता तो विचारात हरवला. त्याचा सुर मंद झाला. तो जणू स्वतःशीच बोलत होता - पण ती झोका उतरवला गेल्यांनंतरही आमच्या घरी येत असे . विचाराविचारांत तो दूर गेला. श्रावणभिजल्या त्या दिवसांपर्यंत जेव्हा अंगणात उभ्या असलेल्या त्या घनदाट निंबाच्या खाली पिवळ्या पिवळ्या निंबोळ्या सांडलेल्या असत आणि झोक्यावर बसून ती लांब लांब झोके घेत असे आणि गात असे "इवले इवले थेंब रे माझा सावन झोका रे ". पण ती तर पावसाळ्यानंतरही आमच्या घरी यायची ..... हो अगदी नक्की ... पण त्या दिवशी कुठे होती ? तो आठवण्याचा प्रयत्न करकरुन थकला, म्हणाला " काहीच आठवत नाही त्या दिवशी ती कुठे होती. "

तरूण निराश झाला. म्हणाला, "फक्‍त एवढंच आठवतं की माझा बाप नमाजाच्या चटईवर बसला होता आणि हातात जपमाळ होती, त्याचे ओठ हलत होते आणि घरात सर्वत्र धूरच धूर दाटला होता.


या कथा वाचतांना वाटु लागते की लागलेल्या या आगीत सारे सारे काही जळुन जाते आणि विषेशःता जेव्हा हा पेटणारा वणवा मानव निर्मीत असतो.

No comments: