Wednesday, August 25, 2010

सुलेमान उसमान मिठाईवाला.

राजाभाऊ जरी रोझे पाळत नसले तरी काय झाले ? ते शुद्ध शाकाहरी असले तरी काय झाले ? ते या रामादानच्या महिन्यात निदान " फिरनी " खाण्यासाठी तरी मिनारा मशिद जवळील सुलेमान उसमान मिठाईवाल्याला भेट देवु शकतात.

रात्रीचे ११.०० वाजले आहेत. सारा महंमद अली रस्ता माणसांनी फुलुन गेला आहे, इफ्तार व खरेदी साठी. खास खव्वय्ये लोकांसाठी तर हा स्वर्गच.

आज रात्री सेनापती रोहनजींच्या एका खादाडी पोष्ट वाचतांना राजाभाऊंनी  या ठिकाणाची फर्माईश केली, मग त्यांच्याचाने रहावेना , मग काय. ताबडतोब, तडक सुलेमान उसमान मिठाईवाल्याकडॆ प्रयाण.

खास रोहनरावांसाठी

3 comments:

रोहन... said...

वा पंत... आता आम्हाला सुद्धा घेऊन चला आपले राज्य दाखवण्यासाठी. आम्ही आपले नेमही मोहिमेवर व्यस्त... :)

आम्ही श्रीमंत नाहीये. आम्ही तर फक्त सेनापती.. :)

महेंद्र said...

आज माझे काम आहे फोर्टला. तिकडे गेलो की आज मिल्ट्री काफे मधली चिकन सल्ली आणि पाव, आणी सुलेमान कडली फिरनी नक्की होणार.
आठवण करून दिल्याबद्दल आभार.

HAREKRISHNAJI said...

रोहन

चुभुद्याघ्या. रात्री १२ वाजता झोपेत लिहिल्याचा हा परिणाम.

महेंद्र,

आपण सीटी किचन मधे जेवला आहात काय ? तेथे गोमांतक जेवण चांगले मिळते ऐकुन आहे