Wednesday, August 25, 2010

जनसेवा दुग्धालय - लक्ष्मी रोड, पुणे.

लक्ष्मी रोडवर राजाभाऊ सपत्नीक फिरायला गेले आहेत आणि जनसेवा दुग्धालयात खाण्यासाठी शिरले नाहीत असे केव्हा होणे नाही. एक वेळ सुर्यचंद्र आपल्या स्थानावरुन ढळतील, सुर्य पश्चिमेला उगवेल, एक वेळ चुलतभावांमधली भाऊबंदकी संपेल पण , वगैरे वगैरे , आणि ते देखील "आज नाही किंवा संपले" याची नकारघंटा ऐकण्यास लागत असतांना देखील.

तिखट मिठाचा सांजा, बटाटा वडा, खरवस, मसाले दुध, साबुदाणा खिचडी, ढोकळा, अगदी मोजकेच पण दर्जेदार पदार्थांची मोहिनीच तशी होती.

वरती १००-१५० ग्रॅम आलेपाक घेवुन तो हाडादणे व तृप्त होवुन बाहेर पडणे.

काहीसे जुनाट , केव्हा केव्हा अगदी पेशवाईच्या काळात मागे घेवुन जाणारया या जनसेवा दुग्धालयाने मध्यंतरी काही काळासाठी आपली कात टाकली होती, पण राजाभाऊंना त्याचे पहिलेच पुरातन रुप भावत होते.

गेल्याच आठवड्‍यातली ही गोष्ट.

जनसेवा दुग्धालय कुठे आहे, इथेच कुठेतरी होते, गेले कुठे करत शोधावे लागले, जेव्हा वर बघुन त्या उपहारगृहाचा बोर्ड पाहुन खात्री करुन घेतली तेव्हा कुठे आत पाऊल टाकले, एवढा याचा कायापालट झालेला, अगदी अगदी ओळखु न येण्यासाठी. नव्या रुपात, नव्या खाद्यपदार्थांच्या यादी सह , नव्या रुपात, आधुनिक थाटामाटात. चकचकीत.

राजाभाऊंनी वटाणा उसळ व ब्रेड खाल्ला, तर त्यांच्या बायकोनी साबुदाणा खिचडी.

पहिल्याच घासात राजाभाऊंच्या बायकोने सांगुन टाकले " चव बदलली आहे, पुर्वीची चव नाही राहिली "

आंबावडी खातखात राजाभाऊंनी मान डोलावली. "खरं आहे तुझे म्हणणे" . आंबावडी व त्याच्या आधी खाल्लेल्या बटाटावडयामुळे त्यांचेही असेच मत झाले होते.

आयुष्यात पहिल्यांदाच राजाभाऊंचे व त्यांच्या बायकोचे एकमत झाले. ( " तु म्हणशील ते खरं " असे ते जे नेहमी बोलत असले तरी देखिल )

No comments: