"पावसाळा हा किती अप्रतिम ऋतू असतो. वस्तूंचे रंगरूपच पालटून जाते. शिवाय रोज एक नवा सण. आज छ्ड्याचा मेळा, उद्या रक्षाबंधन, परवा जन्माष्टमी आणि प्रत्येक सणावार पाऊस हा हवाच. जन्माष्टमीच्या दिवशी जर पाऊस पडला नाही तर कन्हैयाजींची दुपटी कशी काय धुतली जाणार आणि रक्षाबंधनावर तर चार थेंब का होईनात पाऊस पाहिजेच. रक्षाबंधनाच्या सोबत त्याला रमेशची आठवण झाली. ..........
.... जो जेव्हा त्यांच्या घरी पोहोचायचा तेव्हा विमल त्याच्या मनगटावर राखी बांधायची. तशी राखी म्हणजे तरी काय रेशमाचे काही धागे आणि चकचकती बेगड. पण ती जेव्हा मनगटाबर बांधली जाते तेव्हा बघा माणूस कुठून कुठे पोहोचतो. त्याने रक्षाबंधनाचा दिवस कल्पनेत उभा केला. तो गाडीतून उतरून सरळ रमेशच्या घरी पोहोचला होता. विमलने त्याला राखी बांधली होती. नंतर तो आणि रमेश संध्याकाळपर्यंत सजवलेल्या बाजारांतून आणि गल्लांमधून पिरत राहिले आणि विविध दुकानात थांबून थांबून मिठाईही खाल्ली होती . पण त्या दिवसाची अगदी लख्ख आठवण तो कल्पनेत उभी करू शकला नव्हता. ...
... येऊन जावुन त्याच्या जिंदगीला केवळ काही आठवणींचा तेवढा आधार उरला होता. पण त्या आठवणीही हळूहळू एकएक करुन निसटून जात होत्या. ...
...पण हिंदूस्तानातून पाकिस्तानात जाण्याचे अर्थ काय असतात हे त्याला कदाचित नाहीतच नसावे. ते अर्थ समजून घेण्याचा त्याने फारचा प्रयत्नच केला नव्हता. "
केव्हा केव्हा काही पुस्तके अस्वस्थ करुन सोडतात.
फाळणीच्या वेळी सरहद के उसपार गेलेल्या इंतजार हुसैन यांनी लिहिलेल्या "मोरनामा आणि इतर कथा " फार मनाला त्रास देत रहातात. या कथांचा अनुवाद भास्कर लक्षण भोळे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment