गृहसंकुलातील वार्षिक सर्वसाधारण बैठक.
विषय.
होणाऱ्या चोऱ्या.
बंद सदनिकेमधले सर्व सामान दिवसाढवळ्या कोणीतरी सरळ टेम्पो / ट्रक आणुन त्यात ते भरुन खुशाल चोरुन नेणे. आणि त्याची कोणीही दखल घेवु नये.
रखवालदारांची संख्या वाढवावी, प्रत्येक कोपऱ्यात एक . इमारती खाली एक . जास्त रखवालदार नेमा या वर सर्वांचे एकमत .
फक्त राजाभाऊ सोडुन. अश्याने चोऱ्या थांबतील? जर चार रखवालदार असे सामान चोरुन घेवुन जातांना मुक प्रेक्षकाची भुमिका बजावत असतील तर चाराचे आठ झाले तरी काय फरक पडतो असे त्यांचे मत.
त्यांनी एक उपाय सुचवला.
गेटपास बनवायचा. कारखान्यातुन जसा माल बाहेर काढतांना, एखादी वस्तु किंवा उत्पादन बाहेर काढतांना जो गेटवर वॉचमनला द्यावा लागतो तो गेटपास.
जे कोणी सभासद / भाडेकरु आपल्या जागा सोडुन जात असतील त्यांनी सामान घेवुन जाण्याच्या वेळी तसे सोसायटीच्या कार्यलयात कळवावे व तेथुन गेट पास घ्यावा. त्या गेटपास शिवाय सामान भरलेले वहान अजिबात बाहेर जावुन द्यायचे नाही. बाहेत पडायला एकच रस्ता, एकच गेट. गेट वर चोरी पकडणे सहज शक्य.
नेहमी प्रमाणॆच राजाभाऊंच्या कल्पनेला विरोध झाला. विरोधासाठी विरोध, ज्यांना फॅक्टरी, गेटपास ही पद्धत ठावुक नाही अश्यांकडुन विरोध.
"छे हो, काहीतरीच काय ? हे चोरटे काय सोसायटीच्या ऑफीस मधे हे असे सांगुन का सामन नेणार आहेत ? ते कशाला जातील अर्जबिर्ज करायला ? "
"अहो मला ही तेच म्हणायचंय, अश्या वेळी ते अलगद पकडले जातील ना परस्पर सामान चोरुन बाहेर नेणारे"
पण नाहे पटले त्यांना.
No comments:
Post a Comment