पवनाकाठी जाण्याचे खास प्रयोजन काय तर, आंबेमोहराचे प्रचंड आकर्षण.
एकाही दुकानात तो मिळु नये ? मावळात आबेंमोहर पिकणे म्हणे बंद झालय.
कोणीतरी काहीतरी करा रे.
आज घरी काम करणाऱ्या मावशींनी त्यांच्या शेतात पिकलेला इंद्रायणी दिला.
इंद्रायणीचा भात, त्यावर मस्तपैकी कैरी घालुन केलेली डाळ. मऊसुद भात, त्याच्या वर पसरली खुप खुप डाळ, कितीही ओता, त्यात शोषुन घेतली जाणारी, झक्कास कैरी घातलेली आणि सोबत ताजे ताजे लोणचे, कैरीचे.
मग तो मऊसुद भात ह्या अश्या डाळीबरोबर खावा की दाण्याचे कुट घालुन केलेल्या भरल्या वांग्याच्या अटकदार , चटकदार रस्साबरोबर. एकदा खावा का परत मागुन मागुन खावा.
मागच्यांना काही उरले असेल काय ? त्यांच्या साठी काही शिल्लक राहीले असेल काय याचा विचार न करता.
No comments:
Post a Comment