Wednesday, March 23, 2011

पुन्हा एकदा कॉपर चिमणी , वरळीचे.

राजाभाऊंच्या मित्राच्या मुलाचे लग्न झाले.
आता राजाभाऊंना वेध लागले आहेत ,सुनमुख बघण्याचे, आपल्याला मुलगी नाही याचे जे सतत वाईट वाटत आले आहे त्याचे उट्टॆ काढायचे, तिचे खुप खुप लाड, कौडकौतुक करायचे (आणि हे असे सासऱ्यांना असे वागतांना बघुन सासुची जी तळपायाची आग मस्तकी जात असेल ते ही पहाण्याचे )

मुलगा सज्ञान झाला, कायद्याने आता लग्न करायला मोकळा झाला, त्याच्याशी या दिवसात, या विषयावर बोलुन त्याचे मन जाणुन घेवुया हा विचार करत राजाभाऊंनी त्याच्या साठी मेजवानी आयोजीत केली वरळीच्या कॉपर चिमणी मधे.

हे मुळचे कॉपर चिमणी. आधी नॅबच्या जागेत होते मग सध्याच्या जागेत , लोटस कोर्ट मधे त्यांचे स्थलांतर झाले बऱ्यासच्या विसंवादानंतर.  पण झाले ते बरं झाले, ही जागा प्रशस्त आहे.

अत्यंत चविष्ट, रुचकर  अन्न.

कबाब ही यांची खाशीयत.
येथे जाण्याचे दुसरे कारण म्हणजे राजाभाऊंच्या राज्यात कायमचे शाकाहारीच जेवण खायला लागत असलेल्या त्यांच्या वडीलांसाठी तेवढाच रुचीपालट, लुसलुशीत चिकन कबाबांवर ताव मारत, मान डोलवत.


येथे मिळणारा काबुली नान लाजबाब. एका नान खात त्यामधे संपुर्ण कुटुंब जेवते.


1 comment:

Raj said...

Cool snaps :)