Tuesday, March 22, 2011

फडके उद्योग मंदिर, ताजे घरगुती पदार्थ मिळण्याचे ठिकाण- विलेपार्ले

राजाभाऊंचा मोबाईल खणखणला.
संध्याकाळचा दुसरा प्रहर सुरु होता. आज उशिरापर्यंत बसुन कामाचा फडशा पाडण्याचा त्यांचा मानस.

"उद्या सकाळी नास्ताला मिसळ करणार आहे "

"ठिक आहे "

पुढे काय करायचे हे राजाभाऊंना ठावुक होते.
शट डाउन आणि पावले आपसुकच वळली फडके उद्योग मंदिराकडॆ.
पोह्याचा चिवडा, फरसाण, शेव इत्यादी इत्यादी.
फडके उद्योग मंदिर, ताजे घरगुती पदार्थ मिळण्याचे  ठिकाण- विलेपार्ले.

आता मालकांच्या गोड बोलण्यामुळे येथे येणे होते की येथे मिळणाऱ्या , संतुष्ट करुन सोडणाऱ्या पदार्थांमुळे की या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे ?

कधी उपवासाचा फराळी चिवडा, कधी जरासा तिखट बटाट्याचा चिवडा, मधेच डिंकाचा , मुगाचा लाडु, बटाट्याची शेव, साधी शेव, एखादे  भेळीचे पाकीट, तर कधी आलेपाक , कधी हे तर कधी ते. 

अनारसे मात्र राहुन गेली आहेत आगावु मागणी न नोंदवल्यामुळे आणि अजुन येथे मिठाई देखील खायची आहे.

विलेपार्लेच्या खाद्यभ्रमंतीत सापडुन गेलेले एक चविष्ट ठिकाण. 

अश्या ठिकाणी राजाभाऊ गेले की त्यांना काय खरेदी करु नी काय नाही असे होत रहाते आणि मग त्यांच्या बायकोला त्यांच्यावर भडकायला आणखीन एखादे निमित्त मिळते.

No comments: