Saturday, March 19, 2011

आले आले

सकाळी मोबाईल थरथरला.

"आले आहेत "

"बरं, येतो मी "

राजाभाऊंनी मोबाईल बंद केला. 

"यंदाला जास्त महाग आहेत , सातशे रुपये किलो "   हे त्यांनी घाबरत घाबरत सांगितल्याकडॆ राजाभाऊंनी कानाडोळा केला. 

आता बायकोला परमप्रिय असलेले ओले काजु जर किमतीकडे पाहुन घेतले नाहीत तर, ती सालासकट सोलुन काढायची.आले आले रत्नागिरीचे ओले काजु आले.No comments: