पोटात वडवानल पेटलेला, घरी पोचेपर्यंत कैसे धरु धीर आई.
काही काही ठिकाणे अशी असतात त्या तिथे जावुन खावे, मुद्दामुन खाण्यासाठी जावे असे कधीच वाटत नाही.
पण आज राजाभाऊंनी केल खरं धाडस, म्हटलं,
"दिवा एकदाचा पेटवुन टाकूयाच"
आत शिरताक्षणी मन काही प्रसन्न होता जाहले नाही, त्याचे रुप,रंग पाहुन.
त्यात आत मधे फक्त दोघे जणच बसलेले दिसले. सारे सारे उपहारगृह रिकामेच.
हा रिकामेपणा पाहिला की राजाभाऊ अधिकच नर्व्हस होत रहातात.
मेन्यु पाहिला, दर पाहिले, दर पाहिले, मेन्यु वाचला. डोळ्यासमोर मशाली पेटु लागल्या.
आता टोमेटोचे सार, झुणकाभाकर, भरली वांगी, उकडीचे मोदक, थालीपीठ वगैरे वगैरे मराठमोळी पदार्थ खाण्यासाठी चारशे-पाचशे रुपये खणाखणुन मोजले तर बायको पुढचे १०-१२ दिवस आपल्याला उपाशी ठेवले असा राजाभाऊंनी विचार केला. त्यात या उपहारगृहाचा मालकांनी त्यांच्याकडे जेवायला येणाऱ्या मराठी माणासांवर आपल्या मुलाखतीत केलेली टीका आठवत राहिली.
नकोच , येथे भोजन करणे नकोच.
राजाभाऊंनी सुज्ञ विचार केला व ते बाहेर पडता झाले.
"आस्वाद " यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्षे.
"पहिल्या वर्षापासुन आपण येथे सातत्याने खायला जातो मग या रौप्यमहोत्सवी अजुन कसे गेलेलो नाही ? "
चला राजाभाऊ आज तुमच्या नशिबी येथेच खाणॆ आहे.
आतली गर्दी पाहुन , मराठी बांधव चवीचवीने खऱ्याखुऱ्या मराठीमोळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत हे पाहुन राजाभाऊ खुष.
पोळा उसळ.
राजाभाऊंच्या बायकोच्या आवडीचा पदार्थ.
"तुझी आठवण काढत खातोय, पोळा उसळ गं "
" मला आता तेथे घेवुन गेला नाहीस तर याद राख "
एक हवीहवीशी वाटणारी गोड धमकी, बायको कडुन.
No comments:
Post a Comment