Sunday, March 06, 2011

मेरे बसंत की

त्यांचे सांगणे राजाभाऊंच्या कानात शिशाचा रस ओतल्या सारखे शिरले.
खरं की काय ? की हे आपली थट्टा करताहेत ?

"यंदाला पांगाऱ्यावर कीड पडली आहे, पांगारा फुललेला नाही. "
 हे काय् म्हणतात ? काय पांगारा फुललेला नाही ? यांना नक्की काय सांगायचं ? 

सकाळ होई पर्यंत राजाभाऊंच्याने धीर धरवेना. 
एकदाची झाली सकाळ.
राजाभाऊ आपल्या आवडत्या पांगाऱ्याकडॆ धावत सुटले.

दुरुन बुलबुलांचा चिवचिवाट, किलबील कानी ऐकु येवु लागली. राजाभाऊंचे मन शाश्वत झाले.

आहे , आहे, पांगारा बहरलेला आहे, नाहीतर ही अशी पाखरांची झुम्मड मधास्वाद घ्यायल्या उडली नसती. 

  

मग ते जावुन आपल्या पांगाऱ्याखाली निवांत बसले. त्या फुलांचा बहार पहात.

No comments: