Friday, March 04, 2011

कैसे जीये कोई बिरहाके मारे. हाय चंदा गये परदेस चकोरी यहा रो रो मरे.

कागा रे जारे जारे मोहे पीया का संदेसवा ला रे लारे.

कधी कधी विरहणी " कागा रे जा रे जारे मोहे पीयाका संदेसवा ला रे लारे " अशी लडिवाळपणे कागाची विनवणी करते, काय करणार , पिया जो परदेसा गेलेले.
Courtesy -IMIRZA777 



इकडे मन, तन सारे सारे  नुसते झुरणीला लागलेले , त्याची याद सतावुन राहिलेली , काहीच सुधतबुधत नाही,  विरहाच्या ती धगधगती आग आणखीन चेतवायला हा बसंत घर आया. रंगीला.  


आता तरी तो कोयलची साद ऐकुन वेडापीसा होवुन आपल्या ओढीने सर्व कामं सोडुन धावत घरी येईल. पण नाही. कदाचित त्याला यायला जमले नसेल. मनाची समजुन घालायला काहीही कारण. का तो दुसरीच्या प्रेमपाशात तर सापडला नसेल ना ? तो आपल्याला विसरला तर नसेल ना.  त्यात आयो फागुन मास." 


आता काय तर वर्षाऋतु आला , सारा कारोबार ठप्प झालेला, आता तरी त्याची पावले घराकडे वळावीत. कुणीतरी आपल्या येण्याकडॆ डोळे लावुन बसलेले असेल हा ध्यास घेवुन. 


पण नाही, असुन तरी त्याची काहीच चाहुल लागत नाहीयं. 

हाय. ही प्रतिक्षा काही संपता संपत नाही. 


हे वाट पहाणे, वाट पहाणे आणि वाट पहाता पहाता आपली वाट लावुन घेणे. ही वाट पहाणॆ सर्वात मोठी जीवघेणी गोष्ट.  


कधी येणार, कधी येणार ?आला का ? आला वाटते,  त्याची वाट बघताबघता नयन थकुन गेले. त्यात धड झोपही लागत नाही, झोपताही येत नाही, रात्र केवळ तळमळत कशीबशी पुढे ढकललेली.  आपल्याला झोप  लागली आणि तो नेमका त्याच वेळी घरी आला तर ? त्याचा काय समज होईल. त्याचे स्वागत करायला आपण  नाही म्हंटल्यावर तो नाराज होईल.  


पण तो येतच नाही. 


निदान झोपेत तरी तो स्वप्नात येवुन आपल्याला भेटेल म्हणुन झोपायला जावे तर ही निद्रादेखील आपली वैरीण झालेली.


अशी कशी ही विरहावस्था. ही कधीच कोणाच्या वाट्याला येवु नये.



Well.

अशोक कोतवालांच्या "सावलींच घड्याळ " मधल्या एका लेखात राजस्थानी भाषेतले एक गीत वाचले. 

" सोना लेने पिया गये
सूना कर गये देस ।
सोना मिला न पिया मिला
रूपा व्हई गयी केस ॥

कागा सब तन खाइयो
चुन चुन लीजे मांस
ह्ये नैना मत खाईयो
पिया मिलन की आस ॥ 

कागा आंखे निकार दू ?
पिया पास लई जाय ।
पहले दरस दिखायके
पाछी लीजो खाय ॥

मग आपल्या मरणाची वाट बघत राहिलेल्या कागा ला ती सांगते, 


कागा रे. 


हे दोन डोळे मात्र खाऊ नकोस, माझ सारे शरीर लचके तोडुन तोडुन खाऊन टाक, पण हे दोन डोळे. त्यात "त्याला" भेटण्याची आस आहे.  आस लगी  रे पीया दरसन की. त्यांना तु आधी खाऊ नकोस रे.


कागा रे.,


तुला माझे डोळे काढुन देते,  तू ते त्याच्या जवळ घेऊन जा , या डोळ्यांना त्याला एकदा भरभरुन पाहु दे आणि 
मगच कागा रे तु हे डोळेबी खाऊन टाक .



2 comments:

Mahendra Kulkarni said...

क्या बात है.. मस्त!

HAREKRISHNAJI said...

कागा आंखे निकार दू ?
पिया पास लई जाय ।
पहले दरस दिखायके
पाछी लीजो खाय ॥

हे पार डोक्यात घुसुन राहीले आहे.