हे रोहन भाऊ, स्वतः फिरतात तर फिरतात आणि मग त्या बद्द्ल म.टा. मधे सुसाट लिहीत सुटतात.
आता काय तर " सिंहगड ते राजगड ".
एकदा रोहनची सुरेश परांजपेंबरोबर गाठभेट घालुन द्यायल्या हवी.
एकदा रोहनची सुरेश परांजपेंबरोबर गाठभेट घालुन द्यायल्या हवी.
आता राजगड पाहुन झाला, सिंहगडपण काय घरचाच.
पण सिंहगड ते राजगड.
गाडी घेवुन पानशेतच्या अलीकडुन वेल्हेला रस्ता जातो त्यावरुन फिरुन आले पाहिजे.
तेवढेच राजगडाचे कळस दर्शन.
तेवढेच राजगडाचे कळस दर्शन.
शिवजयंती निमित्ते आयोजलेला राजगडावर सोहळा. नुसती धम्माल.
जरतरी नववारी साड्या काय, नाकात नथ काय, गळ्यात मोत्याच्या सरी काय. पगड्या काय, फेटे काय, धोतर काय.
गंमतच गंमत. उत्साह उत्साह तो तरी किती.
जरतरी नववारी साड्या काय, नाकात नथ काय, गळ्यात मोत्याच्या सरी काय. पगड्या काय, फेटे काय, धोतर काय.
गंमतच गंमत. उत्साह उत्साह तो तरी किती.
राजेशभाईंना हे पाहुन वाटले आपण ही फेटा बांधावा मस्त पैकी.
आपण फेटा बांधण्यासाठी काहीतरी आणले असते तर बरं झाल असते.
मग त्यांच्या मैत्रीणीनी दयावंत होवुन जास्तीची आणलेली भरजरी साडी त्यांना दिली फेट्यासाठी.
अहाहा काय तो फेटा, रुबाबशीर. अहाहा काय पण तो तारुण्याचा प्रभाव.

काय राजगडावर कचकचुन थंडी होती ह्या उन्हाळ्याच्या दिवसात.
काश्मिर झक मारावे. चांगलाच हुडहुडुन ताप भरुन आला. पद्मावतीच्या देवळात नुसतं बसुन सकाळ काढावी लागली.
त्यानंतर मग कधीच राजगडावर जाणे झाले नाही, माच्या बघणे राहुनच गेल्याची हुरहुर मनी बाळगत.
काश्मिर झक मारावे. चांगलाच हुडहुडुन ताप भरुन आला. पद्मावतीच्या देवळात नुसतं बसुन सकाळ काढावी लागली.
त्यानंतर मग कधीच राजगडावर जाणे झाले नाही, माच्या बघणे राहुनच गेल्याची हुरहुर मनी बाळगत.
2 comments:
पानी.. आजही आपण इतके फिरता... चला एकदा राजगड दर्शन करू... :) तेवढा आम्हाला पण आपल्या भेटीचा लाभ... :)
रोहन.
माझे स्नेही श्री. सुरेश परांजपे भटकंतीच्या विश्वातील एक चालताबोलता ज्ञानकोष आहेत, साठ पासष्टीतही अजुन ते अगदी एकटे देखिल कुठेकुठे भटकत असतात. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात, दऱ्याडोंगरात , कानाकोपऱ्यात ते फिरलेले आहेत. आणि अगदी आडवाटेवरच्या पाड्यांपासुन, धनगरवाड्यांपासुन, वाटा, रानवाटा सगळी सगळी माहिती त्यांच्या डोक्यात भरलेली आहे.
Post a Comment