पुण्यामधे सर्वात चांगले बुफे जेवण कुठे मिळत असेल तर ते मॅरीयट मधे. येथे येवढे प्रकार मिळतात की बस रे बस.
खाण्याची आवड असणाऱ्यांची येथे चंगळ असते, मेजवानी, मेजवानी ती ही अशी.
काल खरं म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच राजेशभाईंचे रात्री बाहेर जेवायला जाण्याचे मन नव्हते. दुपारचे जेवण खुप म्हणजे खुप जास्त झालेले. भरगच्च पोट घेवुन जाणे आणि या सर्व प्रकारांना योग्य तो न्याय न देणे , हे काही बरोबर दिसत नाहे.
विठठल कामतांच्या " VITS " मधे जेवायला जाण्याचा विचार आयत्याक्षणी राजेशभाईंनी बदलला व ते पाहुण्यांना घेवुन मॅरीयट मधे जेवायला गेले.
का कोण जाणे पण विठ्ठल कामंतांच्याकडॆ जेवायला जावे असे त्यांना हल्ली वाटेनासे झाले आहे. विमानतळाजवळच्या "ऑर्कीड्स " मधे दोन चार जेवणाच्या सुखद अनुभवानंतर राजेशभाई विठ्ठ्ठल कामतांचे नाव लावलेल्या हमरस्तावरील दोनचार उपहारगृहात जेवले तेव्हा त्यांचे मत प्रतिकुल झाले होते.
"ऑर्कीडस " च्या इतक्या उंचीवर पोचल्यानंतर त्यांनी खाली यायला, रस्तारस्तावरील उपहारगृहांना आपले नाव लावायला द्यायला नको होते असे राजाभाऊंना सतत वाटत रहाते. वाकड कडचे सोलकरी काय, सातारा रस्तावरील काय, नगर रोडवरील काय तसे सुमार दर्ज्याचे. मग इतर ठिकाणी कितीही चांगले असले तरी मन मात्र काही केल्या मानत नाही.
तर हे असे ते सहकुटुंब , सहपरिवार रात्री पोचले "मॅरीयट " मधे सेनापती बापट रस्तावरील. पोचायला उशीरच झाला, भारत संघाचे हरणे पहाणे मग त्यावरील संतंप्त प्रतिक्रिया , सर्वांना शिव्या देणे यात बराच वेळ गेला. मध्यरात्री बारा वाजता येथले बुफे जेवण बंद होते, इतर जेवणासाठी मात्र स्पाईस किचन २४ तास सुरु असते.
येथे मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थांवर राजेशभाईंनी चांगलाच आडवा हात मारला, अपवाद फक्त मांसाहारी पदार्थांचा. पण काल मात्र वेळ फार कमी मिळाला, साडॆबाराच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी सर्व आवरायला घेतले , मग त्यांची तशी पंचाईत झाली.
No comments:
Post a Comment