Tuesday, January 22, 2008

बिल्किस बानु व आपण

आज परत एकदा मन सुन्न झालय. आपण व आपला समाज येवढा विवेकशुन्य व संवेंदनाहीन कसा ? ६ महिने गरोदर असलेल्या बिल्किस बानुवर सामुहीक बलात्कार करणे, तिच्या तीन वर्षाच्या मुलीला मरेपर्यंत अमिनीवर आपटुन ठार मारुन टाकणे, तिच्या कुटुंबीयातील १४ जणांचा खून करणॆ , तिच्या आईवर आणि मावशीवर बलात्कार करणॆ !. आपण किती सहजरित्या हे वर्तमानपत्रात वाचतो व एक दोन मिनीट हळहळ व्यक्‍त करतो व विसरुन जातो. काही जणांना तर आसुरी आनंद ही होतो.
आज या खटल्यातील ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. निरपधरांची झालेली परवड, शोकांतीका, त्यांचे दुःख, त्यांच्या यातना,त्यांनी गमवलेले आयुष्य कशानेही भरु येवु शकत नाही अगदी कुबेराचा खजीना त्यांच्यासमोर रीता केला तरी.
या पुढे जातीय दंगली झाल्याच तर दुसऱ्याच क्षणी तेथल्या राजकारण्यांना बाजुला सारुन त्वरीत तो विभाग सैन्याच्या ताब्यात देवुन, दंगलेखारांना कोणतीही दयामाया न दाखवता कठोरात कठोर उपाययोजना केली जावी. मानवतेच्या या शत्रुंना, या दंगल माजवणाऱ्या सैतानांना सैनिकांनी सरळसरळ गोळ्या घालाव्यात , अशी जबरी दहशत बसल्यानंतरच परत दंगली करण्याची या समाजकंटकांची, अमावनी वृतीची, हैवानांची, हिम्मत होणार नाही. ते धजावणार नाहीत. आपले कोण काय वाकडॆ करु शकते, आपल्याला सांभाळून घेणार आहेत हा समज परत कोणीही गुन्हा करतांना बाळगला जावु नये.
दंगलग्रस्तांचे दुःख, वेदना ह्या आपल्याही आहेत.

9 comments:

a Sane man said...

मनातलं लिहिलंत. पण मुख्य समस्या तिथेच आहे ना. कुंपणच शेत खातंय. पोलिसच आरोपी आहेत. एवढं होऊन, सहन करून अजूनही मोकाट सुटलेल्या पोलिसांना शिक्षा व्हावी म्हणून पुन्हा लढण्यासाठी सज्ज होणार्‍या बिल्कीस बानोकडून कुठल्याही अन्यायाविरुद्ध लढणार्‍या व्यक्तीने वा समाजाने धैर्य व बरेच काही घेण्यासारखे आहे. बिल्कीस बानो व कुटुंबियांना सलाम व पुढील लढाईसाठी बळ मिळो हीच आशा.

या प्रकरणाची आपण नेहमीप्रमाणेच त्वरीत नोंद घेतल्याबद्दल आभार.

Vaishali Hinge said...

he ghaDale ashaa raajyaat jithalyaa kityek kuTubiyaatli ek vyaktee pardeshaat aahe..
sushikshit tar bharapur aahet.. rajakaarN dusare kaay..??

Vaishali Hinge said...

ani ho tumache naavloksattaat vaaachale tumache abhinandn

Anonymous said...

भविष्यात असा प्रसंग कुणावरही येवु शकतो....बिल्किस बानुचे मनोगत ऎकुन मन सुन्न झाल....तीने दाखवलेल धॆर्य कौतुकास्पद आहे....पुन्हा असा प्रसंग कुणावरहि येवु नये अशी ईश्वर च्ररणी प्रार्थना....

HAREKRISHNAJI said...

मराठी बॉगचा उपयोग केवळ कथा,कविता लिहीण्यापुरता मर्यादित राहु नये असे मला वाटते.

कोहम said...

We are becoming insensitive day by day. We want our own castles as Hindus as Muslims as Men as Women as Marathi and Amarathi.....anyways, congratulations, I read your name in list of interesting blogs well done....you really make things interesting.

A woman from India said...

एखाद्या स्त्रीसाठी बलात्काराहुन भयंकर काय असु शकते? त्याविषयी तक्रार करणे,साक्षीमधे तिर्‍हाईतांसमोर पुरावे मांडणे आणि पुन्हा पुन्हा ते अपमानाचे क्षण जगणे. ह्या अग्निदिव्याला सामोर्‍या जाणार्‍या बिल्कीसचे अभिनंदन!

HAREKRISHNAJI said...

मला या गंभीर विषयात साथ दिल्या बद्द्ल सर्वांचे धन्यवाद. जेव्हा जे्व्हा समाजात अश्या प्रकारची निंदनीय कॄत्ये होतात तेव्हा तेव्हा आपण बॉगल्सनी संघटीतपणे या विरुद्ध आवाज उठवायला हवा.
त्यात ती ६ महीन्याची गरोदर होती.
या त्यांच्या कॄत्याला क्षमा नाही.

Vaishali Hinge said...

एखाद्या स्त्रीसाठी बलात्काराहुन भयंकर काय असु शकते? >>>>.. मला हे पटत नाही मी स्वता किंवा इअतर मैत्रीणिंना कुणाच्यातरी नजरेनही स्वताची किळस वाटुन घेण हे अनुभवलय आणि पाहिलय.. तरीही वाटते की बलात्कार ही तीची चुक नाहीये तर याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायलाच हवा....बलत्कार कराणारा बाटत नाहि का कधी हा प्रश्न पडतो?