यांना हव्या कशाला गाद्या गिरद्या ? त्या शिवाय झोप चांगली लागते.
खर म्हणजे आपल्यासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. या थंडीच्या दिवसात पण त्यांना हाच आसरा. करोडो रुपये देवस्थानांना दान देण्यापेक्षा, सोन्याची सिंहासने नी भक्त निवास बांधण्या ऐवजी या गोरगरीबांसाठी काही तरी करा.
त्यांना भीक नको तर त्यांना स्वःताच्या पायावर सन्मानेने जगता येईल अशी परिस्थीती या कोट्यावधी रुपयातुन निर्माण करा की. देणाऱ्यांनी व घेणाऱ्यांनी सुद्धा विचार करा.
यांना फुकटची जेवणावळी , भंडारा, भंडारा, अन्नछ्त्र, करत घालु नकात तर त्यांचासाठी रोजगार निर्माण करा.
4 comments:
bolakya wyatha mandatay...waah! Aajkal amchyakade laksha nahi???
हरेक्रिश्नजी,
माझ्या ब्लॉग वरच्या कॉमेंट्स बद्दल आभार.
इतके दिवस ब्रेक घेण्याचे कारण म्हणजे कामात तर व्यस्त आहेच, पण मला असं वाटतं की हे कार्बन सायकल रिव्हर्सल वगैरे आधी मला तरी नीट समजायला हवं नं! उगीच मोठे मोठे शब्द वापरण्यात काय अर्थ आहे?
या फोटोंबद्दल -
तुम्हाला "राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली..." ही कविता होती का सहावी सातवीत?
इतक्या लहान लहान गोष्टींमध्ये मोठे अर्थ शोधण्याची तुमची हातोटी कौतुकास्पद आहे.
अश्विनीजी,
आपण मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहात.
शाळेत शिकलेली ही कविता मला वाटते बहुदा बालकवींची असावी.
नाही, तुकडोजी महाराजांची.
Post a Comment