आपल्या देशातुन परागंदा झालेले पारशी लोक जेव्हा संजाणच्या किनाऱ्यावर उतरले व तेथल्या राजाकडॆ आश्रय मागीतला, तेव्हा त्या राजाने दुधाने काठोकाठ भरलेला प्याला त्यांचा समोर ठेवला.
त्या दुधात पारशी लोकांना साखर टाकली व ते राजाला परत केले, आम्ही हि असेच मिळुनमिसळुन राहु हा संदेश दिला. या दुग्धशर्करा योगाने राजा खुश झाला, त्यांना आपल्यात सामावुन घेतले.
सांगण्याचे तात्पर्य असे की आपण ही सर्वांशी असेच मिळुनमिसळुन रहायला हवे, मी मराठी , तु मद्राशी, तु गुजराथी, तु बिहारी , तु भय्या असा भेदभाव करता कामा नये. स्थानीक, परप्रांतीय या संकुचीत मनोवॄत्तीचा आपण त्याग करायला हवा, आपण सारे भारतीय बांधव आहोत याचे आपण भान राखायला हवे.
प्रांतवाद नको रे मना, वाद करीणे टाळीजे.
1 comment:
संपूर्ण सहमत!
ही गोष्ट आधी कुठे ऐकली होती ते आठवत होतो. मला वाटतं, 1947 The Earth या चित्रपटात ह्या गोष्टीचा उल्लेख आहे. असो. ते महत्त्वाचं नाही. आपल्या विचारांशी सहमत!
Post a Comment