महात्मा गांधीजींच्या अस्थी असलेला कलश मुंबईत मणि भवन मधे ठेवण्यात आला आहे.
३० तारखेला सकाळी ९.३० वाजता त्याचे गिरगाव चौपाटी येथील समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे.
प्रिय महात्माजी,
तुम्हाला केवळ एकदाच मारुन भारतवासी थांबलेले नाहीत, जेव्हा जेव्हा या आपल्या देशात जातीय, धार्मीक दंगेफसाद होतात, वांशीक, जातीय भेदभाव होतात, खैरलांजी सारखी हत्याकांड होतात, तेव्हा तेव्हा परत परत आपला वध करत असतो.
सर्वात मोठे दुःख म्हणजे ..........
3 comments:
प्रजातंत्र दिनाच्या शुभेच्छा!
मराठी ब्लॉग फक्तं कथा कवितांपुरत्या मर्यादित राहु नये ह्या विषयावर मतदान घेता आहात त्याबद्दल थोडेसे:
कथा कविता परवडल्या हो. लोक स्वतःचे खाजगी जीवनच तुमच्यासमोर मांडतात. कधी कधी तर कुणाच्या तरी वैयक्तिक जीवनात आपण उगाचच डोकावतो आहे अशी अपराधी भावना माझ्याच मनात येऊन जाते ब्लॉग्ज वाचताना!व्यक्त होण्याची गरज प्रत्येकाची असते. ती अपूर्ण राहिल्यामुळे हे लोक असं सर्वांसमोर लिहीत असतील का? अर्थातच ज्याप्रमाणे काय लिहायचे हे त्यांनी ठरवायचे तसेच काय वाचायचे हे ही आपण ठरवायचे.
व्यक्तं होण्यासाठी मुळात एखादी जाणिव मनात असावी लागते. कथा कवितांमधुनही सामाजिक आशय, प्रश्न, व्यथा व्यक्त होऊ शकतात. अशा प्रकारच्या जाणिवा मराठी कथा कवितांमधुन कमी सापडतात असे म्हणावेसे वाटते.
आज आपने मेरी आखें खोल दी ! बऱ्याच वेळा मला ही हा मोह टाळता येत नाही.
तुमच्या ब्लॉगवर खाजगी गोष्टी लिहीलेल्या नसतात, निदान माझ्या वाचनात तरी आल्या नाहीत. वैयक्तिक अनुभवातही एक युनिव्हर्सल अपिल असतंच. ते मांडताना स्वतःबद्दल किती आणि काय माहिती द्यावी हे प्रत्येक जण स्वतःच्या कंफर्ट लेव्हल नुसार ठरवतो. अर्थात वाचकही त्यांच्या कंफर्ट लेव्हलप्रमाणे काय वाचायचे ते ठरवतात.
Post a Comment