विलेपार्लेमधील काळे परिवार संचलीत "मी मराठी" मधे रविवारी दि. ३१/१०/२०१० दुपारी रोजी राजाभाऊ आपल्याच बायकोबरोबर, सहकुटुंब, सहपरिवार, मराठी, महाराष्ट्रीय पध्दतीचे भोजन जेवायला गेले.
मटकीची उसळ, बटाटासुकी भाजी, पोळ्या, डाळ भात. सोबत लोणचे, दही आणि कोशिंबीर देखील.
येथे त्यांची गाठ अकस्मीतरीत्या एका ब्लॉगरशी पडली.
"उगीच कोणीतरी"
अशी व्यक्ती ज्यांच्याबरोबर "गप्पा" मारणे किंवा त्यांनी मारलेल्या " गप्पा " ऐकणे हे एक अतिशय आनंददायी असते.
या अचानक झालेल्या अलभ्यलाभाबद्दल त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर ...
या आपल्या मुंबई नगरीत खाण्यासाठी काय हवे ते मिळते. काय पायजे ते.
रस्तावरच्या गाडीवरील वडापावापासुन, गटारावर उभ्या असलेल्या गाडीवरील चायनीज, जैन चायनीज पासुन पंचतारांकीत हॉटेलातल्या देशीपरदेशी खाण्याच्या पदार्थापर्यंत.
पण खरच हवे ते मिळते का ?
हो. मिळते. फक्त एक गोष्ट सोडुन,
महाराष्ट्रीय पद्धतीचे भोजन, संपुर्ण जेवण.
थाळी जेवणासाठी एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच दर्जेदार उपहारगृहे या मुंबईमधे आहेत ( आणि अजुनपर्यंत त्यांची संख्या वाढावी किंवा ती बंद पडु नये यासाठी कोणी मदत वा आंदोलन केल्याचे दिसत नाही )
ठाकुरद्वारचे तांबे, गिरगावातील कोल्हापुरी चिवडा, दादरचे तृप्ती, दत्तात्रय, आणि विलेपार्लेमधील मी मराठी.
बस्स , यादी संपली.
गोरेगावचे "नेवैद्य" तर केव्हाच बंद झाले.
दुर्दैव राजाभाऊंच्या पोटाचे, दुसरे काय !
आणखीन एक ठिकाण.
एक असे माहिमस्थित ठिकाण , जेथे जाण्यासाठी लागणारा बाराबंदीचा खिसा भरभक्कम असावा लागतो प्रसंगी त्यांनी केलेली टीकाही वाचावी लागते आणि कदाचित येथे भोजनाला जाण्यासाठी खास धोतर ,टोपी, कोट घालुन जावे लागत असावे ( आणि म्हणुनच का राजाभाऊं अजुन पर्यंत त्यापासुन लांब राहिले आहेत ?
2 comments:
हरे कृष्णाजी...
पार्ल्याच्या मी मराठीच्या बाजूलाच पुरेपूर कोल्हापूर पण आहे.तिथले धनगरी चिकन-मटण तर एकदम झणझणीतच.
खरं आहे. मी एकदा तेथे खाल्ले आहे. मी शाकाहारी असल्यामुळे तेथे गवारीची भाजी व चपाती खाल्ली होती.
Post a Comment