Tuesday, November 02, 2010

का पण का ?

राजाभाऊंच्या बायकोने राजाभाऊंसमोर वजनाचा काटा का आणुन ठेवला असेल व जबरदस्तीने त्यांनी त्यांचे वजन का करायला लावले असेल ?

राजाभाऊंच्या बायकोने शेवटी कटांळुन त्यांच्या समोर भरलेला डबा आणुन का आदळला असेल ?

राजाभाऊंच्या बायकोने त्यांना फायरींग का बरे दिली असेल ?

राजाभाऊंच्या बायकोला दिवाळीसाठी केलेला फराळ हा दिवाळीतच खावा असे वाटत असेल तर मग राजाभाऊंचा नाईलाज होत असावा.

गरमागरम शंकरपाळ्या, ( नशिब तिचे की राजाभाऊ शंकरपाळे अगदी तळत असतांना कढईत हात घालुन त्यावर ताव मारीत नाहीत ) म्हणजे राजाभाऊंना परमप्रिय.

आज रात्री एकाच बैठकीत थोड्या वेळापुर्वी शंकरपाळ्यांनी भरलेला व क्षणार्धात तळाला गेलेला डबा त्याला साक्षी आहे.

दिवाळीचा फराळ दिवाळीत काय कोण पण खाईल , तो करत असतांना गरमागरम खाण्यात जी मजा आहे ती औरच आहे.

No comments: