Thursday, November 04, 2010

मै इधर जावुं की उधर जावुं ?

पुर्वी आयुष्य किती साधे सरळ होते.
 भल्या पहाटे अभ्यंग स्नान झाले की फडकेवाडीतल्या गणॆश मंदिरात जायचे, समोरील प्रकाशकडे मिसळ खायची,दिवसाची सुरवात करायची किंवा मग अलीकडॆ चव्हाण प्रतिष्ठा न मधे रंगस्वर आयोजीत दिवाळी पहाट मधे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला जावुन दिवसाची सुरेल सुरवात करावी.

आता आयुष्य फार गुंतागुंतीचे बनत चालले आहे.
येवढे छान छान कार्यक्रम दिवाळी पहाटेच्या निमित्ते होत आहेत की मनाचा फार गोंधळ उडतो.
संभ्रमावस्था फार वाईट.

साहित्यसंघात मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला जायचे की रविंद्र मधे "गगन सदन तेजोमय" ला ?
रविंद्रमधला कार्यक्रम राजाभाऊंच्या बायकोला नक्कीच आवडेल.
एकीकडे तिला खुष ठेवण्यासाठी जीव आतुरलेला, दुसरीकडॆ स्वःताचे मन न मारण्याची इच्छा.
चव्हाण प्रतिस्थानात उल्हास कशाळकरांचे गाणे आहे, ते न चुकवुन कसे चालेल ? खुप बहार येइल.
बायकोला पटवुया कसे तरी.

पण.
नको.
उल्हासजींचे गाणे बऱ्याच वेळा ऐकले आहे, नवीन काहीतरी ऐकुया का ? बायकोसोबत रविंद्रलाच जायचे का ?

अं, नको , उल्हास कशाळकरलाच जावुया.

डोक्याच नुसतं भुस्कुट झालयं.

त्यात भरीसभर म्हणुन राजाभाऊंच्या बायकोचा आणखीन निराळाच बेत ठरतोय.

अनेक पर्याय फार वाईट, फार त्रासदायक.

2 comments:

Unknown said...

aakash kandil mastch ahe background war...

ani ashya gondhalat padnyatch khari maja yete.....

HAREKRISHNAJI said...

निर्णय चुकला असं वाटायला लागलायं. रविंद्र मधे खुप मस्त कार्यक्रम होते आहे. सह्याद्री वाहिनीवर त्याचे प्रक्षेपण होत आहे