Wednesday, November 03, 2010

गिरगाव रंगावली ग्रुप

दिपावली जशी जशी जवळ येवु लागते तशी सर्व प्रथम आठवण होते ती रंगावली प्रदर्शनाची, असे हे प्रदर्शन जे पहाण्यासाठी जीव आसुसलेला असतो, आतुरतेला असतो.

रंगावली प्रदर्शन भरवावे तर गिरगाव रंगावली ग्रुपनेच.

गेले कित्येक वर्षे सातत्याने हे सारे जादुगार सेंट्रल चित्रपटगृहासमोरील भीमाबाई राणे शाळेत रंगावली प्रदर्शन भरवत आलेले .

केवळ अप्रतिम, देखण्या रांगोळ्या, डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या. चित्तवेधक. अश्या रांगोळ्या दुसरी कडे बघणे नाही. धन्य ते कलावंत. अपार मेहनत, अविरत कष्ट, दिवसरात्र जिवापाड मेहनत करुन या क्षणभंगुर रांगोळ्या काढल्या जातात.

भल्या त्या रांगोळ्या दिवाळीनंतर पुसल्या जात असतील पण त्यांची आठवण स्मृतीत सारे वर्षे मनात रेंगाळत रहाते. .

1 comment:

yog said...

mastch........
thanks for sharing..