शनिवार उजाडला. राजाभाऊंच्या बायकोने या वेळी राजाभाऊंचा श्रावणबाळ करायचा ठरवला.
आदल्या रात्री घोर वादळात गाडी चालवुन दमलेल्या राजाभाऊंच्या मनात या वेळी अंमळ विश्रांती घ्यायचे ठरत होतं. हे तिने बहुदा जाणले असावे, मग " मी काही म्हणतं नाही हो, त्यांची इच्छा आहे , नाहीतरी काय तिथे जावुन आरामच करायचा आहे " असे करत मॅडमनी राजाभाऊंनी प्रवृत केले पाचगणीस जाण्यास.
राजाभाऊंना ठावुक होतं आपण पाचगणीत कुठे रहायचे. अगदी निवांत, शांतपणॆ, जिथे महाबळॆश्वरचा कलकलाट नाही, गर्दी नाही, निरव शांतता, सुंदर लोकेशन, मस्तपैकी रहाण्यास बंगल्याचा एक मोठा भाग. बाहेर मस्तपैकी बाग, गुलाब फुललेली आणि वरती "झुलवा मै बैठे आज पी के संग झुले ", मंद मंद सुगंधित शीतल चाललेल्या पवनाचा आनंद लुटत.
त्यात परत वर दुधात चांदणॆ, त्रिपुरी पोर्णिमा.
No comments:
Post a Comment