राजाभाऊंना एक गोष्ट अगदी सखोल विचार करुन करुन देखिल अजुन पर्यंत समजलेली नाही.
राजाभाऊंच्या बायकोने मरमर मरुन दिवाळीत खाण्यासाठी दिवाळी फराळ करायचा आणि मग तो न खाता " प्रकाशचा साबुदाणा वडा मस्त असतो, आज खावासा वाटतो " अशी त्यांच्याकडॆ फर्माईश करायची.
या बायकांचं लॉजिक ध्यानी येणे महाकठीण, प्रत्यक्ष ब्रम्हदेवाचा बाप खाली आला तरी त्याला त्यांचा युक्तीवाद कधीच कळणार नाही.
फराळाचे पदार्थ करता करता गरमागरम खायला खायला जावे तर " धीरसबुरी आहे का नाही ? थांब जरा देवापुढे अजुन ठेवायचे आहे, त्या आधी खावु नकोस "
देवापुढे ठेवल्यानंतर खायला जावे तर " आत्ताच खावुन सर्व संपवणार आहेस का ? मग दिवाळीत् काय खाशील " करत फायरींग द्यायची.
आणि ऐन दिवाळीत ....

खरं म्हणजे आज राजाभाऊंना प्रकाश मधे मिसळ खाण्याची इच्छा होती, मस्त पैकी वांगेपोहे , बटाट्याची भाजी घातलेली मिसळ. हि मिसळ मिटक्या मारत मारत खाण्याची त्यांची इच्छा मात्र अपुरीच राहिली, आतल्या छोटेखानी उपहारगृहात बसायला जागा नव्हती आणि रस्तावर गाडी उभी करायला.
एवढ्याश्या छोट्याचा जागेत इतके मस्त पदार्थ बनवुन ते खाऊ घालायचे !
राजाभाऊंनी मग आनंदी आणि उत्साही होण्याचे ठरवले.
आता दिवाळीच्या सणावारी मुकेशभाईंच्या घरी त्यांना साल मुबारक करायला रिकाम्या हाताने कसे जायचे ? आदर्श मिठाई मंदिरा मधे बासुंदी फार छान मिळते ती त्यांनी घेतली.
मुकेशभाईंचे नाव, पोट तर स्वःताचेच
1 comment:
वांगी पोहे मला पण आवडतात. तसेच फ्लॉवर पोहे, किंवा मेथी पोहे पण मस्त लागतात. मेथी +कांदा घालून केलेले पोहे मात्र अप्रतीम... :) दिपावलीच्या शुभेच्छा.
Post a Comment