आतापर्यंत वाटत होतं सर्वत्र मिळणारी शहाळी केवळ केरळातुनच येतात, कदाचित नारळपाण्याचा व्यवसाय करणारी मंडळी प्रामुख्याने केरळी असतात म्हणुन की काय . जसे कुठेही जा गाडीच्या टायरचे पंक्चर काढण्याच्या धंद्यात हीच लोक असतात. केरळची शहाळी किती छान.
हा समज खोटा पडला तो ओझरला. गजाननाचे दर्शन झाल्यावर मग घश्याला कोरड फुटली, बाहेरील गरम वातावरणाची जाणीव होवु लागली, समोरील दुकानामधली शहाळी खुणवु लागली.
ये की इकडॆ, पी मला, पी म्हणतो ना. अरे .
मग काय , राजाभाऊंनी बाईंना सांगितले
" एक शहाळे द्या, कोवळी मलई ".
"अजुन एक द्या , कोवळी मलई हवी,
अजुन एक द्या अशीच मलई हवी, खुसखुशीत, गोड.
एका शहाळ्यातील चवदार पाणी प्याल्यांनतंर समाधान होण्याचे काय नाव नाही, मग, दुसरे, त्यानंतर तिसरे आणि मग अंतरात्मा तृप्त झाला, आता बस्स ( का बायकोने डोळे वटारल्यामुळॆ व वाढत्या पोटाची जाणिव करुन दिल्यामुळे ? )
बाई म्हणाल्या ही "’शहाळी इथलीच. "
वाटलं नव्हतो ओझरचे पाणी एवढे गोड असेल ते.
No comments:
Post a Comment