कठोर परिश्रम करुन गेल्या चार महिन्यात बांधलेले संयमाचे बांध जेव्हा एका मागोमाग एक करत ढासळत रहातात तेव्हा.
भोगा आपल्या कर्माची फळं, राजाभाऊ, भोगा.
आपलेच हात आणि आपलचं तोंड, मग त्याची सजा पोटानी भोगायलाच हवी नाही का !
बुलंद किल्याची पहिली तटबंदी कोसळली ती गोरेगावच्या "ग्रॅंड सरोवर" मधे.
मोहाला शरण जातांना माणसाला वाटत असते मी तो मोह माझ्या ताब्यात ठेवला आहे. पण तो त्याचा भ्रम असतो ही गोष्ट लगेचच दोन दिवसांनी गोरेगावच्याच ओबेरॉय मॉल मधल्या "बी बी सी " मधे पनीर व चीझ रहित सिझलर्स खातांना ही लक्षात येते.
मग परत तिसऱ्या दिवशी केवळ नाईलाजच झाला आहे, भुकेपोटी एका ऋषींनी तर कुत्राही खाल्ला होता हे मनाला समजवत "राधाकृष्ण" मधे अर्धाकच्चा रवा डोसा खाल्ला जातो आणि तो सुद्धा "फुड पॉईंट" मधे बटाटा वडा खावुन सुद्धा पोट न भरल्यामुळे.
माणसाचा आणखीन एक भ्रम असतो. हे सारे थांबवणॆ माझ्याच हातात आहे, मी ते कधीही ते थांबवु शकतो. हा पण भ्रम आहे हे मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी मालाडमधे "जाफ्रन "मधे बिर्याणी खातांना लक्षात येवु लागते.
गेले तीन दिवस आपल्या कर्माची फळं भोगत राजाभाऊ घरी बसले आहेत.
आतबाहेर, आतबाहेर करत. आता तरी शहाणॆ व्हा, राजाभाऊ, शहाणॆ व्हा. सोसवील एवढेच करा.
No comments:
Post a Comment