परवाच्याला ससानीयन बेकरी मधे जावुन प्लम केकची पहाणी केली होती, दोनचार स्लाईस चाखुन पाहिल्या होत्या.
मग आज अनायसे त्या भागात राजाभाऊ गेले होते तेव्हा त्यांनी सहजच बेकरीत डोकावुन पाहिले. आतुन केकनी भरलेले ट्रेच्या ट्रे बाहेर येत होते, कपाटच्या कपाट भरली जात होती. हा असा एकदम फ्रेश माल पाहिल्यावर राजाभाऊंच्याने रहावते काय ?
आणि मग काय राजाभाऊ लालचेस शरण गेले.
वाल्याकोळ्याच्या पापात त्याची बायकोपण सहभागी असते.
No comments:
Post a Comment